शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

भूजल शोषितांना ‘जलधर’ची साथ

By admin | Published: October 26, 2016 2:52 AM

भूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे.

- विशाल शिर्के,  पुणेभूजलाचा अतिउपसा होणाऱ्या, तसेच उन्हाळ््यात पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावात जलव्यवस्थापन करण्यासाठी जलधर भूजल व्यवस्थापन संघाची स्थापना करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यातील २७० गावांची निवड करण्यात आली असून, जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भूजल व्यवस्थापन लोकसहभागातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने हाती घेतला आहे. त्या नुसार प्रत्येक गावात जलधर भूजल व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार असून, त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून गावात पडणारा पाऊस, सध्याचा भूजल वापर याचा आढावा घेण्यात येणार आहे. पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात पाण्याचा वापर किती होतो याचा आढावा घेऊन भूजलाची तूट आहे की नाही हे समिती ठरवेल. तूट आढळल्यास तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास पाठविण्यात येईल. त्यानुसार जलपुनर्भरणाची योजना राबविण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून संबंधित गावाचा जलधर (पाणी धरुन ठेवणारा भाग) निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पाणी उपलब्धतेवरुन कोणती पिकपद्धती अधिक किफायतशीर ठरेल, पिकांना पाणी देण्याची पद्धत कोणती असावी, याबाबतही समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी संबंधित गावात उभारलेल्या रेन गेजमधून पाऊस कसा मोजायचा, निरीक्षण विहिरींची पातळी कशी तपासायची याचे प्रशिक्षण देखील संबंधितांना दिले जाईल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील यांनी दिली. जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. आत्तापर्यंत २७० पैकी १०८ गावांचे सखोल भू-जल सर्वेक्षण झाले असून, त्या गावांचा नकाशा देखील तयार झाला आहे. ही सर्व माहिती नकाशासह भूजल विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. अशी असेल समितीगावाच्या नावाने जलधर भूजल व्यवस्थापन संघाची नोंद चॅरिटी कमिश्नरकडे होईल. या संघाचा अध्यक्ष पंचायत समिती सदस्य असेल. तर गट विकास अधिकारी पदसिद्ध सचिव असतील. त्यात पाणी तज्ज्ञ, गावातील प्रतिनिधी, सिंचन, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, सर्कल या सदस्यांचा समावेश समितीत असेल. या योजनेंतर्गत जानेवारीपासून याची माहिती संकलित करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गावाचा जलनकाशा तयार होणार आहे. जलधर योजनेतील जिल्हानिहाय गावेजिल्हागावे नगर ६५जळगाव ३३अमरावती ४९बुलडाणा ३९सातारा १३औरंगाबाद १९पुणे ५२