शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

भूगर्भातील पाण्याचे नियोजनच आता तारणार !

By admin | Published: April 24, 2015 1:40 AM

पावसाचा अंदाज बघूून पीक पद्धतीत बदलाची गरज

अकोला : गतवर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी हवामानशास्त्र विभागाने केलेले पावसाचे भाकीत बघता, हे वर्षदेखील कमी पावसाचे असल्याचे एकूण चित्र समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी भूगर्भातील पाण्यावरच नियोजन करावे लागणार आहे. शेतकर्‍यांनासुद्धा पावसाचा अंदाज बघून पीकपद्धतीत बदल करावे लागतील.गतवर्षी पडलेल्या पावसाची आकडेवारी आणि यावर्षीचे भाकीत बघता, पाण्याचे नियोजन करणे किती अपरिहार्य आहे, हे लक्षात येते. उदाहरणार्थ अकोला जिलतील गेल्या दोन-तीन वर्षांतील पावसाची सरासरी आकडेवारी अत्यंत कमी आहे. २0१२-१३ मध्ये जिलत केवळ ६७४ मि.मी., तर २0१३-१४ मध्ये ८९४ मि.मी. पाऊस झाला. २0१४-१५ मध्ये पावसाळ्य़ात केवळ ५७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबरपर्यंत या पावसाची नोंद ६८0.७0 मि.मी. झाली आहे. या पाच वर्षांत पावसाचे सरासरी चित्र बदलले आहे. कधी कमी, तर कधी जास्त असे पावसाचे स्वरू प आहे. २0१४-१५ या वर्षात १४0 मि.मी. पाऊस २३ जुलै व ९0 मि.मी. पाऊस ८ सप्टेंबर या एकाच दिवशी कोसळला. म्हणजेच पावसाळ्य़ातील अर्धा पाऊस हा एकाच दिवशी काही तासांत कोसळत असल्याचे या आकडेवारीवरू न निदर्शनास येते. त्यामुळे गतवर्षी पावसाचे पाणी भूगर्भाला मिळाले नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् व जलसंधारण विभागाने काढला आहे.यासंदर्भात राज्याचे कृषी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भारतीय हवामानशास्त्राला इतिहास असल्याने या शास्त्राच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. यावर्षी विदर्भ, मराठवाडा,पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी कोणती पिके घ्यावी, याचे नियोजन करण्याची गरज आहे. असेच हवामान राहिल्यास शेतकर्‍यांना कमी कालावधीची पिके घ्यावी लागतील. तूर, सोयाबीन, घेवडा, मका आदी हुकमी पिकांचा विचार शेतकर्‍यांना करावा लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान येथील कृषिविद्यापीठाच्या मृद् व जल संधारण विभागाचे प्रमुख डॉ सुभाष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अलिकडच्या काही वर्षात सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने भूगर्भातील पाण्याचे जपून नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. *पीकपद्धती बदलावी लागणार?पूर्व व पश्‍चिम विदर्भातील पीकरचना वेगवेगळी आहे. पश्‍चिम विदर्भात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी पिके घेतली जातात. पूर्व विदर्भात धान या मुख्य पिकासह इतर कडधान्य-तृणधान्य व तेलबिया पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचा जो अंदाज वर्तविण्यात आला आहे, तो बघितल्यास पीकपद्धती बदलावी लागण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांना यासाठी कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी लागणार आहे; पण त्यासाठी पुन्हा हवामानशास्त्र विभाग दुसरे भाकीत वर्तविणार आहे, तेही बघणे आवश्यक राहणार आहे.