नागपूर : शिवसेनेमुळेच ज्यांना व त्यांच्या पिताश्रींनादेखील मंत्रिपदे मिळाली, त्यांनी शिवसेनेवर अशा पद्धतीने मते मांडणे म्हणजे खालच्या पातळीला जाऊन राजकारण करणे आहे. शेतक-यांच्या संपाला मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणारे विखे-पाटील यांना शेतक-यांबद्दल कितपत जाणीव आहे हे जनता जाणतेच. त्यांची आजची शिवसेना पक्षाबाबतची भूमिका म्हणजे विषारी कीटकनाशकाप्रमाणे आहेत.पुणतांब्यात झालेला शेतकरी संप फोडू पाहणा-या या संपफोड्या विखे-पाटलांना जनताच त्यांची जाणीव करून देईल. त्यामुळे त्यांना शेतक-यांबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. ज्यांच्यामुळे विदर्भ व राज्यात शेतक-यांच्या जीवनाचा अंतही झाला आहे. यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्व व संवेदनशील विचारांमुळे राज्यात शेतक-यांसाठी होत असलेले यशदायी प्रयत्न, त्यामुळे त्यांच्या पक्षातील कमी झालेली आमदाराची संख्या यामुळे त्यांना आलेल्या वैफल्यातून ते असे बोलू लागले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुयोग्यरीत्या झाली पाहिजे, याचा आग्रह शिवसेनेने पूर्वीपासूनच धरला आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे. वेळोवेळी शिवसेनेने मांडलेली आश्वासक व मदतीची भूमिका ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यामुळे केल्या जाणा-या सर्वसमावेशक प्रयत्नांतून एकंदर राज्यातच सेनेची परिणामकारकता वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षातील काही जण मात्र विनाकारणच राज्य सरकारमधून कोण कधी बाहेर पडेल, यासाठी आशाळभूतप्रमाणे पाहात आहे.
शिवसेनेवर शेतक-यांचा वाढता विश्वास ही विरोधी पक्षाची खंत- आ. डॉ. नीलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 6:14 PM