पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ त्यामुळे उकाडा वाढला आहे.मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान १२़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ देशात ओडिशा आणि सौराष्ट्र, कच्छ या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे़ आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, रायलसीमा आणि तमिळनाडूच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे़ गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १५़१, जळगाव १५़२, कोल्हापूर १७़६, महाबळेश्वर १५़४, मालेगाव १५़४, नाशिक १३़४, सांगली १४, सातारा १४़५, सोलापूर १६़१, मुंबई २१़६, अलिबाग २०़६, रत्नागिरी १९़१, पणजी २१़२, डहाणू १९़५, भिरा १८़५, औरंगाबाद १५, परभणी १४़७, अकोला १४़६, अमरावती १५़४, बुलडाणा १७़२, ब्रम्हपुरी १४, चंद्रपूर १५, गोंदिया १२़५, नागपूर १२़६, वाशिम १३़६, वर्धा १३़६, यवतमाळ १५़४ (प्रतिनिधी)
उकाड्यात वाढ!
By admin | Published: February 06, 2017 2:31 AM