संजय खांडेकरअकोला, दि. ६- आगामी सप्टेंबर २0१७ पासून देशभरात लागू होणार्या जीएसटीत (गुड्स अँन्ड सर्व्हिस टॅक्स) महाराष्ट्रातील व्हॅट फॉर्मेट मॉडेल ठरणार आहे. ही माहिती केंद्रातील उत्पादन शुल्क विभागाकडून आलेल्या जीएसटीच्या प्रशिक्षणकर्त्यांनी दिल्याने महाराष्ट्रातील विक्रीकर विभागाच्या अधिकार्यांची मान उंचावली आहे. सर्व करप्रणाली रद्द करून देशभरात एकच कर भरण्यासाठी जीएसटी लागू करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमत्री अरुण जेटली यांनी घेतला; मात्र जीएसटीच्या परिषदेशी राज्याच्या अधिकार्यांची स्वायत्तेबाबत सुरू असलेल्या बैठका कुठल्याही निर्णयाप्रत न पोहचल्याने जीएसटी लागू करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता आगामी सप्टेंबरपासून जीएसटी लागू होणार असल्याचे संकेत आहेत. त्यासाठी देशभरातील राज्यातील विक्री कर विभागातील अधिकार्यांना जीएसटीबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. अकोल्यातील विक्रीकर विभागातील अधिकार्यांनाही अमरावती येथे प्रशिक्षण दिले गेले. जे अधिकारी जीएसटीबाबत प्रशिक्षण देत आहे त्या अधिकार्यांनी राज्यातील व्हॅट प्रणालीचाच अभ्यास केला आहे. केंद्रातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी प्रशिक्षण देताना महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीचे कौतुक केले. महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीमधील ८0 टक्के भाग जीएसटीत घेतला असल्याचे त्यांनी उदाहरणासह येथे अधोरेखित केले. यासोबतच महाराष्ट्राची व्हॅट कर भरणाची ऑनलाइन प्रणाली देशात आदर्श म्हणून समोर आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य यामध्ये आघाडीवर असल्याचेही येथे सांगितले गेले. त्यामुळे महाराष्ट्र देशात कर वसुलीच्या प्रक्रियेत आघाडीवर भूमिका बजावत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.-जीएसटीतील कर भरणा प्रणालीत महाराष्ट्रातील व्हॅट प्रणालीचा ७0 ते ८0 टक्के भाग असण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणादरम्यान केंद्राच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांचे तसे म्हणणे आहे; मात्र याबाबतचा मसुदा अजून तरी समोर आलेला नाही.- सुरेश शेंडगे, उपायुक्त, विक्रीकर विभाग, अकोला.* जीएसटी लागेपर्यंत व्हॅटजोपर्यंत राज्यात जीएसटी लागू होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच व्हॅट आकारल्या जाणार आहे. २0१७-१८ पर्यंत उद्दिष्ट यंदाही विक्रीकर नित्याप्रमाणे घेणार आहे. जेव्हा जीएसटी लागू होईल त्यानंतर व्हॅट आकारणी गुंडाळल्या जाईल. पुढील सुधारित आदेश येईपर्यंत ह्यजैसे थेह्ण राहणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
महाराष्ट्राची व्हॅट प्रणालीच ठरणार जीएसटीचे मॉडेल!
By admin | Published: January 07, 2017 2:45 AM