शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

जीएसटी घटल्याने हज यात्रेकरूंसाठी ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 6:03 AM

दहा हजारांची होणार बचत : नव्या नियमानुसार १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारणी; इच्छुक यात्रेकरूंची संख्या वाढली

- जमीर काझी

मुंबई : केंद्र सरकारने नववर्षापासून हवाई प्रवासावरील जीएसटी दरात कपात केल्याने हज यात्रेकरूंसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. जानेवारी महिन्यापासून हवाई प्रवासासाठी १२ टक्यांऐवजी ५ टक्के जीएसटी दर आकारला जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या हज यात्रेच्या तुलनेत यंदा सहा ते दहा हजार रुपये कमी खर्च येणार आहे.

हज यात्रेसाठी भारताला एक लाख ७५ हजार जागांचा कोटा आहे. त्याचा पाठपुरावा केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत केला जातो. या वर्षी आॅगस्ट महिन्यात होणाºया हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटीकडे २,६७,२६१ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. राज्यनिहाय संगणकीय सोडत (कुरा) काढून त्यांची निवड केली जाणार आहे.

केंद्रीय हज कमिटीच्या मार्फत ग्रीन व अझिझा या दोन श्रेणींतून गेल्या वर्षी १ लाख २८ हजार भाविक सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी प्रत्येक प्रवाशामागे सरासरी दोन लाख ४१ हजार ते दोन लाख ९५ हजार इतका खर्च आला होता. मात्र, गेल्या वर्षी हवाई वाहतुकीसाठी १२ टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. केंद्र सरकारने १ जानेवारीपासून विविध २८ सेवांवरील जीएसटीचे दर कमी केले. त्यामध्ये हवाई प्रवासासाठी आकारण्यात येणारा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रवास खर्चात सरासरी ६ ते १० हजारांचा फरक पडणार असल्याचे हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसुद खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

राज्यातील हज यात्रेकरू निश्चितया वर्षी आॅगस्टमध्ये होणाºया हज यात्रेसाठी राज्यातून एकूण ३५ हजार ६५८ अर्ज आले होते. ९ हजार ३३० जागांचा कोटा असल्याने सोमवारी त्यांची निश्चिती संगणकीय लॉटरीद्वारे करण्यात आली. हज हाउसमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, राज्य हज समितीचे गफर मगदुम, अधिकारी इम्तियाज काझी आदी उपस्थित होते.महिला यात्रेकरूंच्या संख्येत वाढआत्तापर्यंत महिलांना हज यात्रेसाठी मेहरम म्हणजे आपले पती, पिता किंवा भावासमवेतच जाता येत होते. मात्र, गेल्या वर्षापासून केंद्र सरकारने पुरुषाविना चार महिलांनी एकत्रितपणे हज यात्रेला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी ५०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदा अशा इच्छुक महिलांची संख्या २,२७९ इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी ११०० महिला इच्छुक होत्या.

 

टॅग्स :Haj yatraहज यात्रा