मुंबई : रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर तसेच लोकलमध्ये फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलेला असतानाच अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर मध्य रेल्वे आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा बल) धडक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत जवळपास १६ हजारांहून अधिक फेरीवाल्यांची धरपकड करून कारवाई करण्यात आली. या कारवाईतून जवळपास ६१ लाख रुपये दंड वसूल केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे विविध कारवायांद्वारे आरपीएफने १ कोटीहून अधिक दंड वसूल केला आहे.या कारवाईत १६ हजार ७३१ फेरीवाल्यांना पकडून दंड वसूल केला. यातील १0२ जणांना तुरुंगवासही भोगावा लागला. मशीद, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथबरोबरच वडाळा, जीटीबी, गोवंडी, मानखुर्द, पनवेल स्थानकांत सर्वांत जास्त कारवाई झाली. ही कारवाई करतानाच रेल्वे सुरक्षा दलाकडून अन्य कारवायाही करण्यात आल्या. अपंग डब्यात अन्य प्रवाशांकडून घुसखोरी करण्यात येत असून, अशा प्रवाशांनाही पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जवळपास १४ हजार ८८५ घुसखोरांना पकडल्याचे सांगण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यास आरपीएफकडून चांगले नियोजन केले आहे. त्यामुळे नऊ महिन्यांत ९ हजार ५९४ प्रवाशांवरही कारवाई केली. यात २८७ जणांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म तसेच पादचारी पुलांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. काही वेळेस प्रवाशांकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई होते. एकूणच फेरीवाल्यांच्या उपद्रवांना आळा बसावा यासाठी मध्य रेल्वे आरपीएफने जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यांत कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली.
>जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांतील कारवाईकेसेसदंडतुरुंगवासअपंग डब्यात घुसखोरी१४,८८५ ३५ लाख ७ हजार१०२रेल्वे रूळ ओलांडणारे९,५९४ २२ लाख ४७ हजार१६महिला डब्यात घुसखोरी१,८६१0७ लाख ३५ हजार१0टपावरून प्रवास करणे१,७७५६ लाख ४२ हजार १२तृतीयपंथीयांविरोधात कारवाई१,५९८८ लाख ९तिकीट दलाल१५४३२ हजार १६५