लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : कोट्यवधी रुपयांच्या लाकडाचा साठा असणाऱ्या वनविभागाच्या काष्ठ विक्री आगाराची सरंक्षक भिंत ऐन पावसाळ्यात कोसळली असून आतील साग, खैर, एैन व इंजायली या मूल्यवान लाकडांची सुरक्षा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे संरक्षक भिंतीच्या कामाचा पहिला टप्पा मे महिन्यातच पूर्ण झाला होता.शासनाकडून ही भिंत बांधण्याकरीता चार टप्प्यात बांधकाम करण्याकरीता १६ लाख ५७ हजाराची निविदा मंजूर करण्यात आली. हे काम भरत पालवी हे करीत आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाचा एवढा सुमार दर्जा होता की, उशिरा सुरु झालेल्या पावसाच्या पहिल्या सरींमुळेच ते भुईसपाट झाले. लोकमतकडून हा विषय विक्रमगडचे वनक्षेत्रपाल एऩ बी. मुठे यांच्या पुढे मांडण्यात आल्यानंतर त्यांनी विभागीय कार्यालयाकडे अहवाल पाठविला असून या कामाचे कोणत्याही प्रकारचे बील अदा केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी निविदेप्रमाणे संरक्षक भिंतीचे फांउडेशन व बांधकाम योग्य असल्याचे सांगितले असून पावसाला दोष दिला असल्याने त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत शंका व्यक्त होत आहे. मात्र, ठेकेदाराने या संदर्भात आपली प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे आता पुढे काय घडते, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.कोणते होते कामाचे निकष?निकषानुसार भिंतीच्या बांधकामासाठी पायात १:२:४ याप्रमाणातील बेड काँक्रीट, त्याच्यावर डबर बांधकाम जोत्यासह, परत आर. सी. सी. कोपींग, त्यावर २३ से मी. जाडीचे व १़ ६० मी उंचीचे विटांचे बांधकाम करणे अपेक्षित होते. विटाच्या बांधकामावर १० सेमी जाडीचे कोपींग तसेच ़विट बांधकामाच्या दोन्ही बाजूला प्लॅस्टर प्रस्तावित होते.अहवाल मी डिव्हिजन आॅफिसला पाठविला आहे. मात्र, ठेकेदार पडलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम दोन दिवसात पुन्हा करुन देणार आहे. - एन. बी. मुठे, वनक्षेत्रपाल, विक्रमगड
काष्ठ आगाराची संरक्षक भिंत महिनाभरात कोसळली
By admin | Published: July 11, 2017 3:54 AM