मुंबई - मुंबईसह संपूर्ण राज्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. रविवारी सकाळपासूनच स्वागतयात्रा, चित्ररथ आणि ढोलताशा पथकांचे आकर्षक संचलन यांनी वातावरण भारून गेले आहे. मुंबईतील गिरगावातील स्वागतयात्रा आकर्षणाचे केंद्र ठरली होती. तर ठाणे, डोंबिवलीसह नाशिक, पुणे आदी शहरांमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा आणि नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी गुढ्या उभारून पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यात आला. तर विविध ठिकाणी शोभायात्रा, बाईक रॅली काढून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. यंदाही मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक स्वागतयात्रा मुंबईकरांना पाहण्यास मिळाले. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईत दिसत होते.
राज्यातील विविध भागांत साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्याचे व्हिडीओमुंबई
डोंबिवली
नाशिक
जळगाव