- जयंत धुळप
अलिबाग- चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि या दिवशी हिंदू मराठी पंचांगाचे अनन्यसाधारण महत्व असते. गुढीपाडवा आणि नवे मराठी पंचांग असे आगळे नातेच आहे. कोकणात अनेक ठिकाणी गुढी उभारल्यावर मराठी पंचांगाची विधीवत पूजा करुन ते वापरण्यास प्रारंभ करण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून आहे. परंतु हे पहिले हिंदू मराठी पंचांग 1831 सर्वप्रथम अलिबाग जवळच्या छोट्याशा थळ या गावांत या पहिल्या मराठी छापील पंचांगाचे जनक आद्यमुद्रक गणपत कृष्णाजी पाटील यांनी छापून संपूर्ण हिंदू बांधवांना अनन्य साधारण क्रांतीकारी अशी भेट दिल, या घटनेस यंदा तब्बल 187 वर्ष पूर्ण होत आहेत.
187 वर्षांपूर्वी ‘छपाई’ हा विषय ब्रिटिश सरकारच्या ताब्यातील तर ‘मराठी मजकूर छपाई’ हा तर एक देशद्रोहाचा गुन्हाच मानला जात असे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अलिबाग जवळच्या थळ गावांतील जिद्दी, हिंदू धर्मवेड्या आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या गणपत कृष्णाजी पाटील या अवघ्या 32 वर्षीय तरूणाने त्या काळात म्हणजे 1831 मध्ये ‘मराठी मजकूर छपाई’ची मुहूर्तमेढ या मराठी पंचागाच्या छपाई अंती रोवून अलौकीक असे धाडस मराठीजन आणि संस्कृतीसाठी केले.
अमेरिकन मिशन प्रेस मध्ये दोन रुपये पगारावर नोकरीस प्रारंभ ब्रिटीश काळात आणि अनेक संदर्भात ‘गणपत कृष्णाजी’ अशा नावाने ओळखले जाणारे गणपत कृष्णाजी पाटील यांचा जन्म अलिबाग जवळच्या थळ या गावी 1799 मध्ये झाला. आजच्या थळ गावातील थळबाजार या परिसरात ते राहात असत. भंडारी जातीतील अल्पशिक्षित गणपत कृष्णाजी पाटील आपल्या गृहस्थ उदरनिर्वाहाच्या निमित्ताने मुंबईत गेले आणि मुंबईच त्यांची कर्मभूमी बनली़.त्यांची मुद्रण क्षेत्नांतली कामगिरी इंग्रज कंपनीचे राज्य महाराष्ट्रात सुरू होण्याच्या क्रांतीकाळातील आह़े. मुंबई बेटावर इंग्रजांची सत्ता होती. तेथे मिशनरी लोकांचा ‘अमेरिकन मिशन प्रेस’ हा मोठा छापखाना होता. या प्रेसमध्ये मराठी छपाई देखील होत असे इंग्रजी, मराठी, गुजराती या भाषांतून स्वस्त किंमतीत पुस्तके छापून प्रसिद्ध करणे हा या छापखान्याचा एक उद्देश होता. हा छापखाना 1813 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यात ‘बायबल’चे भाषांतर ‘शुभवर्तमान’ म्हणून छापले जात असे. शालोपयोगी पुस्तकांची छपाई देखील येथे होत असे. ‘ऋग्वेदांतील पहिल्या मंडलाचे मूळ संस्कृतसह मराठी व इंग्रजी भाषांतर’या सारखी पुस्तकेही या छापखान्यांतून प्रसिद्ध होत असत.
ब्रिटीशांच्या प्रेस मध्ये टाईप घासताघासता स्फूरले क्रांतीचे स्फूलिंगया अमेरिकन मिशन प्रेसमध्ये गणपत कृष्णाजी पाटील यांनी प्रिंटिंगचे टाइप घासण्याच्या कामावर मासिक दोन रूपये पगारावर आपल्या नोकरीस प्रारंभ केला. येथेच ते आपल्या हुशारीने प्रेसमन पदापर्यंत पोहोचले. छापखान्यात हिंदुधर्माविरुद्ध प्रचार करणाऱ्या साप्ताहिकाचा मजकूर छापला जात असतांना त्यांना वाईट वाटे व ते अस्वस्थ होत असत. आपल्या हिंदुधर्माविषयक माहितीची व इतरही धार्मिक पुस्तके आपल्या मराठी भाषेत छापण्याचे काम आपल्या देशात कोणी का करू नये? असे विचारमंथन त्यातूनच त्यांच्या डोक्यांत सुरू झाल़े.
पहिल्या मराठी पंचांगाकरीता मराठी माणसाचा पहिला छापखानाआपणच ते काम करावे असा अंतिम निश्चय करुन एक क्रांतिकारी पाऊल टाकण्याचा निर्णय त्यांनी 1825 मध्ये घेतला. त्यावेळी छपाईची यंत्ने मिळणो अवघड होते. शिवाय त्यांच्याकडे त्यासाठी पैसेही नव्हत़े. प्रेसमन असल्यामुळे शिळाप्रेसची रचना त्यांनी समजून घेतली़ आणि स्वत:च एक लाकडी प्रेस बनविला. लहान लहान शिळांचे तुकडे जमविले आणि छपाईचा प्रयोग करून पहिला़ शिळाप्रेससाठी लागणारी शाईदेखील त्यांनी अनेक प्रयोगानंतर स्वत: बनविली़. आणि त्यांनी 1831 साली आपल्या थळ या मुळ गावांत आपला छापखाना उभारला़. मराठी माणसानें उभारलेला महाराष्ट्रांतला पहिला छापखाना म्हणून या घटनेला त्याकाळात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले होते.
गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग पुजनाची परंपरा सुरुहिंदूधर्मविषयक पुस्तके छापण्याच्या उद्देशाने निघालेल्या या छापखान्यांत पहिलेच छपाईचे काम त्यांनी केले ते म्हणजे, ‘हिन्दु पंचांग’ छपाईचे. त्यासाठी त्यानी संपूर्ण पंचांग स्वत:च्या अक्षरात लिहिले होते. या पहिल्या छापील पंचांगाचे आकडेशास्त्रीय ग्रह-काळ गणीत रखमाजी देवजी मुले यांनी केले होते. गणपत कृष्णाजी पाटील यांनी या पहिल्या मराठी पंचागांत वर्षफल, वर्षभविष्य, ग्रहदशा आदि सर्व प्रकारची माहिती दिली होती़. हिन्दू वर्षप्रतिपदेला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी पूजण्यासाठी लोकांनी हे पंचाग वापरण्यास प्रारंभ केला. हिंदुधर्माभिमानी गणपत कृष्णाजी पाटील यांनी पुढे आपल्या या छापखान्यांत शेकडो पुस्तके छापली़.
पहिल्या मराठी पंचागाच्या माध्यमातून हिन्दू संस्कृतीस गवसले स्वातंत्र्य ब्रिटीश छापखान्यात वापरण्यात येणा:या शाईमध्ये गाईगुरांच्या चरबीचा उपयोग केला जात असल्याने त्याकाळात ब्रिटीश छापखान्यातून आलेल्या मराठी पूस्तकांना कोमी शिवत नसत़, नेमक्या याच मुद्यावर गणपत कृष्णाजी पाटील यांनी संशोधन करुन, आपल्या छापखान्यात गुरांच्या चरबीऐवजी साजुक तुपाचा वापर करून छपाईची शाई तयार केली़. परिणामी त्यांच्या छापखान्यांत पुस्तके व पोथ्या छापलेल्या आहेत, हे हिन्दू बांधवांना कळल्यावर त्यांना थेट देवघरांत स्थान मिळाले. पूढे अनेक भाषांतरित ग्रंथ आणि अनेक नियतकालिके आणि साप्ताहिके त्यांच्या छापखान्यात छापली जावू लागली आणि सन 186क् मध्ये छपाईबरोबरच प्रकाशन व्यवसायाचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गणपत कृष्णाजी पाटील घातला़. ब्रिटीश काळात मराठी आणि हिन्दू संस्कृतीस असणारे पारतंत्र्य पहिल्या मराठी पंचागाच्या माध्यमातून दुर हिन्दू संस्कृतीस स्वातंत्र्य मिळवून देणारे गणपत कृष्णाजी पाटील यांचे निधन 186क्मध्ये झाले, परंतू त्यांनी केलेल्या अनन्य साधारण कर्तृत्वाचे स्मरण दर गुढीपाडव्याला पंचांग पुजनाने अनाहूतपणे होत आहे.