मुंबई - लातूर येथील कीर्ती अॅग्रोेटेक या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यु झाला. या घटनेत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी दोषी अढळल्यास त्यांना निलंबित करण्यात येईल, असे कामगारमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी आज विधान सभेत सांगितले.याबाबतची लक्षवेधी आमदार शरद सोनावणे यांनी मांडली होती. त्यावर निलंगेकर यांनी सांगितले की, कारखान्याविरु ध्द एफआयआर दाखल करु न कारखान्याचे दोन संचालक व दोन कर्मचारी यांना अटक केली आहे. उपसंचालक, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य संचालनालय , नांदेड यांनी कारखान्यातील कामगारांना अशा प्रकारचे काम करण्यासाठी सुरिक्षततेचे प्रशिक्षण न देणे, काम करताना कामगारांना धोक्याची कल्पना न देणे, कारखान्यातील कामगारांची वैद्यकीय तपासणी न करणे, कारखान्यातील धोकादायक भागांना सुरक्षा कवच उपलब्ध करून न दिल्याबाबत त्यांच्यावर आठ फौजदारी खटले दाखल केले आहेत.मृत कामगारांच्या कायदेशीर वारसांना भरपाई विमा योजनेंतर्गत प्रत्येकी दहा लाख सानुग्रह अनुदान दिले असून, कारखान्याच्या व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या कुटुंबियातील प्रत्येकी एक वारसदारास नोकरी देण्याचे मान्य केले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्यात काम करणार्या कर्मचाऱ्यांचा दि न्यु इंडिया इन्श्युरन्स कं.लि. यांच्या मार्फत विमा उतरवला असून, नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही निलंगेकर पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करणार
By admin | Published: March 25, 2017 12:29 AM