ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ : जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले याचा आनंद आहे. जळगावसह खान्देशाचा विकास व्हावा यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा होता. त्यासाठी शिवसेना असो किंवा काँग्रेसचा मंत्री असो त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे आपण स्वागतच केले आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
खडसे म्हणाले, खान्देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा हीच यानिमित्ताने अपेक्षा होती. जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गुलाबराव यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून कामे करावे.
शेतकरी पुत्र व कट्टर शिवसैनिकाचा सन्मान
शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरणाराशेतकरी पुत्र, कट्टर शिवसैनिक व निष्ठावंत कार्यकर्त्याला राज्यमंत्रीपद देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्या रुपाने जिल्हावासीयांना न्याय दिला आहे. प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या या नेत्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल,असा विश्वास सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्याअसता,पदाधिकाऱ्यांनीआनंदव्यक्तकेला.