औरंगाबाद : जळगाव येथील घरकुल प्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गुलाबराव देवकर यांनी दाखल केलेला जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे यांनी गुरुवारी फेटाळला.
जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घरकुल प्रकरणात शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून देवकर यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल
झाला होता.
या प्रकरणात 21 मे 2क्12 रोजी देवकर यांना अटक झाली होती. जळगाव न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. त्याविरोधात पोलिसांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर 6 ऑगस्ट 2क्12 रोजी खंडपीठाने त्यांचा जामीन रद्द केला होता.
या निकालाला देवकरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 17 डिसेंबर 2क्13 रोजी सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय योग्य ठरवत प्रकरण धुळे विशेष न्यायालयाकडे वर्ग केले होते.
धुळे येथील विशेष न्यायालयात देवकर यांनी 1क् जानेवारी 2क्14 रोजी जामीन अर्ज दाखल केला. त्यांचा हा जामीन अर्ज न्यायालयाने 14 मार्च रोजी फेटाळला होता.
याविरोधात देवकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली. यावर 16 सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी झाली. त्यावेळी घरकुल प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून, आरोपी हे प्रभावशाली असल्याने त्यांना जामीन मंजूर केल्यास साक्षीदारावर प्रभाव पडू शकतो, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत
न्या़ टी.व्ही. नलावडे यांनी
देवकरांचा जामीन अर्ज फेटाळला़ (प्रतिनिधी)