एसटी संपकऱ्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्याबाजुने लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत.
यामध्ये शरद पवारांच्या घरावर चाल करून जाण्याचा कट कसा शिजला त्याची माहिती घरत यांनी न्यायालयाला दिली आहे. सदावर्ते मुद्दाम या घटनेच्या वेळेस कोर्टात गेले होते. सदावर्ते साहेबांचा विजयोत्सव बारामतीत साजरा करण्याची मिटींग झाली होती. घटनेच्या दिवशी सकाळी 11.35 वाजता नागपूर मधून व्हॉटअॅप कॉल आला होता, त्यानंतर सारी जमवाजमव सुरु झाल्याचा दावा घरत यांनी केला आहे.
अभिषेक पाटील, सविता पवार, मोहम्मद शेखसह चौघांनी सिल्वर ओकची रेकी केली होती. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु असल्याचे घरत यांनी न्यायालयात सांगितले. नागपूर कॉल नंतर 'पत्रकार पाठवा' चा मेसेज आला होता. यानंतर पत्रकारांना फोनाफोनी झाली आणि आंदोलनावेळी बोलविण्यात आले. दुपारी 2.42 काही पत्रकारांनाही कॉल झाले. हा सुनियोजित कट होता, असा दावा घरत यांनी करताना मोहम्मद शेखने व्हॉट्सअॅप मेसेजचा त्यांनी हवाला दिला.
यामध्ये शेखने सावधान शरद ...शरद असे बॅनर तयार करण्यात आल्याचा उल्लेख केल्याचे म्हटले आहे. आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. त्यामुळे वाढीव कोठडीची आवश्यकता आहे. या बॅनरवर सदावर्ते पती पत्नीचा फोटो आहे, असा दावा देखील घरत यांनी केला आहे.