मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील आठवीपर्यंतचे ८८ लाखांहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आहार पुरविण्यासाठीची निविदा प्रक्रिया रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यांपासून बंद असल्याने शाळांमध्ये खिचडी शिजलेलीच नाही. येत्या ८-१० दिवसांत तांदूळ मिळाला नाही तर ९० टक्के शाळांमधील पाेषण आहार बंद हाेण्याची शक्यता आहे.
राज्यात काय स्थिती?६७,५४९एकूण शाळा८८,६७,३०४एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ३०,६५७ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ८,८५६
मराठवाडा१७,५१५एकूण शाळा२३,०३,१७०एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ५,६१६ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ४,७२५
कोकण७,५४८एकूण शाळा८,०३,५२९एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? १,४९० मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? उपलब्ध नाही
विदर्भ१२,८०७एकूण शाळा१२,९९,१७५एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ३,९९९ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? १,२२२
प. महाराष्ट्र१८,२९६एकूण शाळा२५,७७,२७८एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ७,६०४ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? २,७९१
उ. महाराष्ट्र११,३८३एकूण शाळा१८,८४,१५२एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ११,९४८ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ११८
या जिल्ह्यांना तांदूळ मिळाला : चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम
सध्या कुठे काय स्थिती?सध्या काही शाळा त्यांच्याकडे शिल्लक असलेला तांदूळ व इतर साहित्यातून शालेय पाेषण आहार शिजवून मुलांना देत आहेत.पोषण आहाराचा तांदूळ काही जिल्ह्यांत दर महिन्याला शासकीय गोदामात जमा होतो. तर काही जिल्ह्यांमध्ये त्याचा थेट शाळांना पुरवठा होतो.पुरवठा करण्याचा नवीन करार झालेला नाही. त्यामुळे जुन्या पुरवठादाराकडे करारानुसार मागणी करता येत नाही.अधिकृतरीत्या शाळांचा अहवाल मागविला आहे. तूर्तास अनेक शाळांनी पोषण आहार संपल्याचे तोंडी कळविले आहे.आठवडाभर पुरेल इतका पोषण आहार काही शाळांकडे सध्या शिल्लक आहे. त्यामुळे त्या शाळांनी मागणी नोंदवलेली नाही.