मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जिम उघडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जिम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जिम सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी जिम मालकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी जिम सुरु करण्याचा सल्ला दिला होता.
तसेच, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे बोलणे झाले. त्यांचेही म्हणणे आहे की जिम सुरु झाले पाहिजे. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय, असे राज ठाकरे म्हणाले होते. याचबरोबर, राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती.
आणखी बातम्या...
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन
यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया
भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर
शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"