मुंबई : मुंबई विद्यापिठाचे संकेतस्थळ गेल्या काही दिवसांपासून हॅक झाल्याची चर्चा विद्यापिठ वर्तळात सुरू आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापिठाने एका समितीची स्थापना केल्याचे सूत्रांकडून समजते. इंजिनियरिंगच्या सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मुल्यांकनाचा निकाल या संकेतस्थळावरूनच टप्प्या-टप्प्याने जाहिर होत आहे. दरम्यानच्या काळात ही वेबसाईट हॅक झाल्याच्या भितीने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. या संकेतस्थळावर विद्यापिठाविषयक महत्त्वाची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.संकतेस्थळ हॅक केलेल्या हॅकर्समार्फत या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. शिवाय हॅकर्सकडून इंजिनियरिंगच्या निकालात फेरफार करण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यापिठाच्या अधिकार्यांशी संपर्क होऊ शकला नाही....................
मुंबई विद्यापिठाचे संकेतस्थळावर हॅक
By admin | Published: May 19, 2014 12:38 AM