'है तैयार हम' महारॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:48 PM2023-12-27T12:48:52+5:302023-12-27T12:49:26+5:30

Congress News: अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून  ' है तयार हम ' रॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

'Hai Laadar Hum' Maharalli will give power and strength to the activists, Vijay Wadettiwar expressed confidence | 'है तैयार हम' महारॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास

'है तैयार हम' महारॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास

 नागपूर - देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम  सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही सर्व तयार असून  ' है तयार हम ' रॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल असे म्हणत लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन केंद्राच्या दडपशाही धोरणाला उलथवून टाकूया, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

नागपूरमध्ये भारत जोडो मैदानाला भेट देत तयारीचा आढावा घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले की, सोनिया गांधी यांची लोकशाही वाचविण्यासाठी संविधान बचाव सभा नागपूरात झाली होती त्यामुळे देशात परिवर्तन झाले. आज पुन्हा काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या ऐतिहासिक भूमीत महारॅलीने साजरा केला जात आहे. काँग्रेसचा १३८ वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. विदर्भाने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे त्यामुळे है तैयार हम महारॅली कार्यकर्त्यांना शक्ती आणि बळ देणारी ठरेल.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल  गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य यांच्यासह हजारो पदाधिकारी व लाखो काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. ज्या मैदानात हा मेळावा होत आहे त्याला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव दिले असून ‘है तैयार हम’ अशी या महारॅलीची संकल्पना असून, मेळाव्याची सर्व तयारी झाली आहे, अशी माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: 'Hai Laadar Hum' Maharalli will give power and strength to the activists, Vijay Wadettiwar expressed confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.