शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विदर्भात गारपीट, मराठवाड्यात अवकाळी!

By admin | Published: January 02, 2015 1:21 AM

राज्याच्या बहुतांश भागाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला़ विदर्भात गारपीट, तर मराठवाड्यात बुधवारी रात्री व गुरुवारी अवकाळी पाऊस झाला़

मुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला़ विदर्भात गारपीट, तर मराठवाड्यात बुधवारी रात्री व गुरुवारी अवकाळी पाऊस झाला़ बेमोसमी पावसाने आंबा, द्राक्ष, डाळिंबांसह केळी,गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मुंबईतही ढगाळ वातावरण होते.अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह््यात बुधवारी रात्री झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे अकोलासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. बुलडाणा जिल्'ातील संग्रामपूर, नांदूरासह बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, इरला परिसरात गारपीट झाली़ दुपारी ४ वाजता बुलडाणा शहर धुक्यामध्ये हरवले होते़ तर वाशिम जिल्'ात सरासरी ७.१७ पावसाची नोंद झालीआहे. यवतमाळ जिल्'ातील उमरखेड आणि अमरावतीत अचलपूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने गहू, हरभरा आणि केळी पिकाचे नुकसान झाले असून दुपारपर्यंत अनेक तालुक्यांत रिमझिम सुरू होती. धुळेजिल्'ात बुधवारी रात्री झालेल्या रिपरिपीमुळे गहू आणि हरभरा पिकांना धोका निर्माण झाला आहे. सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्'ात गुरुवारी जोरदार पाऊस झाला़ कोल्हापूर जिल्'ात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तर सातारा जिल्'ात पावसाचा शिडकावा झाला. औरंगाबादसह कन्नड, फुलंब्री, सोयगाव खुलताबाद तालुका परिससरात पाऊस झाला़ जालना जिल्'ातही सरी कोसळल्या.लातूर जिल्'ातील बहुतांश भागात अवकाळी, तर काही भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला़ बीडमध्ये १.७७ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्'ात झालेल्या पावसाने खरीप हंगामातील कापूस काळा पडला आहे़ त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच ऊस तोडणीवरही परिणाम दिसून आला़ परभणी जिल्'ातही या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ हिंगोलीत गुरूवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. सेनगाव तालुक्यातील खुडज परिसरात पिके आडवी झाली. माळहिवरायेथे दहा ते पंधरा मिनिटे गारपीट झाली. उस्मानाबादसह कळंब, तुळजापूर, लोहारा, भूम तालुक्यात अवकाळी पाऊस झाला़ तर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व परिसरातील जवळपास ६०० हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)मेघगर्जनेसह पावसाची शक्यता!च्पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन तो आता उत्तर आंध्रप्रदेश -दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर सरकला आहे़ परिणामी महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला़ पुढील ४८ तासांत मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़ सोलापूर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाच्या तडाख्याने डाळिंब, द्राक्षे, बोर, शेवगा या बागासह हुरड्यात आलेली ज्वारी, शेतात पडलेल्या कांद्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सध्या फुलोऱ्यात असलेल्या आंब्याचा मोहोर गळून पडला आहे़ द्राक्षांच्या बागाही आडव्या झाल्या आहेत़