पुणे : पश्चिम बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्राच्याजवळ या हंगामातील पहिले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
इशारा : १४ मे रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.१५ मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.कोकण, गोवा व मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.१६ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.............या जिल्ह्यात गारपीटची शक्यता१४ मे रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, सातारा जिल्ह्यातकाही ठिकाणी १४ व १५ मे रोजी गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात १४ व १५ मे रोजी वादळी वार्यासहपावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात १४ मे रोजीपावसाची शक्यता आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरातील मध्य भागावर ते येण्याची शक्यता असून १५ मेपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे ते दक्षिण पश्चिम आणि पश्चिम बंगालच्या खाडीला लागून पश्चिमेकडे जाताना चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते १६मेच्या सायंकाळी अथवा १७ मेच्या सकाळपर्यंत वायव्य दिशेला सरकेल. नंतर उत्तर ईशान्य दिशेकडे वळण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अंदमानचा समुद्र व त्याच्या परिसरात अनुकुल परिस्थिती निर्माण होऊन १६ मे रोजी या परिसरात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अंदमान बेटे व निकोबार बेटांच्या परिसरात १५ व १६ मे रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून जोरदार वारे वाहतील.