अजून अर्धा तास बाकी! अजित पवार अन् शरद पवारांच्या बैठकांना आमदार किती? पोहोचू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:44 PM2023-07-05T12:44:27+5:302023-07-05T12:45:00+5:30
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थक आमदारांची वेगवेगळी बैठक बोलविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार पेचात सापडले आहेत. धरले तर चावते, सोडले तर पळते अशी राजकीय परिस्थिती राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांसमोर उभी ठाकली आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थक आमदारांची वेगवेगळी बैठक बोलविण्यात आली आहे. यामुळे दोन्ही गट शक्तीप्रदर्शन करत आहेत. अशातच दोघांच्या बैठकांना किती आणि कोणते आमदार उपस्थित राहतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या बैठक स्थळी जवळपास २८ आमदार पोहचले आहेत, तर शरद पवारांच्या बैठकस्थळी ८ आमदार पोहोचले आहेत. धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन आले आहेत. तर छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी अजित पवारांच्या बैठकीला ४३ आमदार आले आहेत, काही आमदार वाहतूक कोंडीत अडकले असल्याचे ते म्हणाले.
यामुळे अजित पवार यांच्या बाजुने संख्याबळ अधिक आहे. प्राजक्त तनपुरे हे अजित पवारांसोबत होते, परंतू ते शरद पवारांच्या बैठकीला पोहोचले आहेत. नरहरी झिरवळांसह अजित पवारांचे मंत्री आदी आमदार अजित पवारांच्या बैठकीला पोहोचले आहेत.