नितीन गव्हाळे, अकोलादेशभरात १ कोटी २० लाख लोक दृष्टिबाधित असून, दरवर्षी पाच लाखांवर नेत्रगोलकांची गरज आहे. तर प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत देशासमोर १ लाख ७० हजार उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ७२३ नेत्रगोलक संकलित करण्यात आले. देशात एक हजार व्यक्तींमागे केवळ १० व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. परिणामी अनेक दृष्टिबाधित व्यक्ती प्रतीक्षेत आहेत़ त्यासाठी देशाने आधी नेत्रदान, मगच अंत्यसंस्कार ही पद्धत स्वीकारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे़ आरोग्य विभागाकडून राज्यात नेत्रदानाविषयी जनजागृती करुनही नेत्रदात्यांची संख्या वर्षाकाठी १० हजारांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. राज्याला दरवर्षी १० हजार नेत्रगोलकांची गरज असताना हा आकडा कमीच असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालातून अधोरेखित होते़ या अहवालानुसार दृष्टिदानात तामिळनाडू प्रथम, तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे़ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्राला तीन वर्षांत १८ हजार ६०० नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्याने हे उद्दिष्ट पार करून २२ हजार १०१ नेत्रगोलक संकलित केले. तामिळनाडूला २१ हजार २०० चे उद्दिष्ट होते. या राज्याने २६ हजार ७०४ नेत्रगोलक संकलित केले. त्यापाठोपाठ गुजरातने २४ हजार ९०४ नेत्रगोलक संकलित केले.
आधी नेत्रदान, मगच अंत्यसंस्काऱ़!
By admin | Published: June 10, 2015 2:14 AM