शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मानेवरील अर्ध्या किलोची गाठ काढली

By admin | Published: May 12, 2017 2:05 AM

गेल्या पाच वर्षांपासून मानेला गाठ घेऊन जगणाऱ्या मराठवाड्यातील तरुणीवर जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या पाच वर्षांपासून मानेला गाठ घेऊन जगणाऱ्या मराठवाड्यातील तरुणीवर जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी या गाठीला चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होते. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता; पण हे आव्हान स्वीकारून या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढून टाकण्यात जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. ही गाठ १३ सेंटिमीटर असून तिचे वजन अर्धा किलो होते.जे. जे. रुग्णालयाच्या डॉ. रजत कपूर यांनी ही गाठ काढली. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रूपाली पवार (१६) असे या तरुणीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या गळ्याला उजव्या बाजूला एक लहानशी गाठ आली होती. गळ्याला असलेली ही गाठ वाढत जात होती, यामुळे कोणीही डॉक्टर उपचार करण्यासाठी तयार होत नव्हता. सर्व डॉक्टरांनी नकार दिल्यानंतर नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आईवडिलांनी तिला मागील वर्षी जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या वेळी या रुग्णालयातील डॉक्टरांनी विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. या चाचणी अहवालात गळ्याला असलेली गाठ ही मेंदूच्या रक्तवाहिनीला जोडलेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे कठीण होते; पण कुटुंबीयांची समजूत काढून डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करून गाठ काढली, असे रूपालीच्या पालकांनी सांगितले.अवघड शस्त्रक्रिया रक्तस्रावाचा होता धोका-वर्षभरापूर्वी या मुलीला तिच्या आईवडिलांनी उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. तिच्या गळ्याच्या उजव्या बाजूला ही गाठ होती. तपासणीदरम्यान ही गाठ मेंदूच्या रक्तवाहिनीला चिकटलेली असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे अवघड होते. कारण, हलकासा धक्का जरी लागला असता तर रक्तस्राव होण्याची शक्यता होती; पण तरीही ही शस्त्रक्रिया करण्याचे आम्ही ठरवले. ही मोठी शस्त्रक्रिया करून आम्ही गाठ काढण्यात यशस्वी झालो. - डॉ. रजत कपूर, प्राध्यापक व प्लास्टिक सर्जरी विभाग कक्षप्रमुख, जे. जे. रुग्णालय