पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट कायम आहे. राज्यात नांदेड येथे ४़५ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदविले गेले़ असून, अर्धा महाराष्ट्र महाबळेश्वरपेक्षाही अधिक गारठला आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे. प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस)पुणे ६़८, नगर ११, जळगाव ७़८, कोल्हापूर १५़३, महाबळेश्वर १२़१, मालेगाव ९, नाशिक ८़२, सांगली १६़४, सातारा १२़५, सोलापूर १४़४, मुंबई २०़३, अलिबाग १७़३, परभणी ५़५, पणजी २०़२, डहाणू १५़५, भिरा १३़५, उस्मानाबाद ९़८, औरंगाबाद ८़४, नांदेड ४़५, अमरावती १०़८, चंद्रपूर ११़२, गोंदिया ७़७, नागपूर १०़१, वाशीम १३़२, वर्धा ९़४, यवतमाळ १२़४़
अर्धा महाराष्ट्र महाबळेश्वरपेक्षा थंड
By admin | Published: December 28, 2015 4:17 AM