यदु जोशी / मुंबईनाफेडमार्फत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी निम्मी तूर ही व्यापाऱ्यांची होती आणि ती त्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून घेऊन नाफेडच्या भरवश्यावर कोट्यवधी रुपये कमावल्याचे आता गावोगावी उघडपणे बोलले जात आहे. व्यापाऱ्यांनी आणलेल्या तुरीची खरेदी आम्हाला डावलून केली जात असल्याचा आक्रोश अनेक गावांमध्ये होता. सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक, नाफेड, पणन अधिकारी व अन्य खरेदी यंत्रणा आणि व्यापारी यांच्या संगनमतातून ही खरेदी करण्यात आली. व्यापाऱ्यांनी गावोगावी शेतकऱ्यांकडून ३ हजार ते साडेतीन हजार रुपये क्विंटलने तुरीची खरेदी करून ठेवली आणि नाफेडमार्फत खरेदी सुरू झाल्यावर तेथे आपल्याकडील माल ५ हजार ५० रुपये क्विंटल या आधारभूत किमतीने सरकारला विकला. रात्रीच्या अंधारात व्यापाऱ्यांची तूर खरेदी केंद्रांवर पोहोचत होती. शेतकरी हितासाठी कार्यरत असलेल्या भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने या सर्व गैरप्रकारांची माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे दिली असल्याचे वाहिनीचे अध्यक्ष अभिजित फाळके यांनी लोकमतला सांगितले. पुन्हा व्यापाऱ्यांचेच चांगभलं-नाफेडने बंद केलेली खरेदी दबावामुळे पुन्हा सुरू झाली तर व्यापारी सध्या बाजारात खरेदी करीत असलेली तूर पुन्हा ५ हजार ५० रुपये भावाने नाफेडकडे नेऊन टाकतील, अशी दाट शक्यता आहे. अशावेळी पुन्हा व्यापाऱ्यांचच चांगभलं होईल. फक्त शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जाईल, याची हमी शासन देणार का?च्राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर साठवायला जागा नाही. ती उघड्यावर ठेवा आणि बाजूला उन्हात बसा असे शेतकऱ्यांचे हाल झाले.राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये मालाची माहिती देणारी ‘डिस्प्ले सिस्टिम’च नाही. त्यामुळे किती माल आला, किती मोजला,अनुक्रमानुसार खरेदी झाली की नाही याची माहिती सार्वजनिक होत नाही.नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्याचा नंबर लागल्यावर नाफेडचे अधिकारी तुरीची गुणवत्ता तपासतात. चिरीमिरी दिली की तुरीचे छोटे दाणे मोठे दिसतात आणि पैसा सरकवला नाही तर मोठे दाणे छोटे दिसू लागतात, असे शेतकरी बोलतात.बाजार समित्यांचे सरकारला पत्र-राज्यात सुमारे ३१६ तूर खरेदी केंद्रे आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे २0 हजार क्विंटल तूर विक्र ीसाठी आलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरु च असल्याने लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत.पणनमंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणारनाफेडच्या केंद्रांवर ४८ तासांत तूर खरेदी सुरू न झाल्यास मी स्वत: ट्रॅक्टरमध्ये बसून सहकार आणि पणन मंत्र्यांच्या घरात तुरीची पोती टाकणार आहे.- आ. बच्चू कडू, प्रहार संघटना.... तर तूर नाकारलीच समजा च्व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात आहे अशी ओरड शेतकऱ्याने केली तर त्याची तूर चाळणी उभी करून दाणा खाली गाळायचा अन् तूर निकषात बसणारी नाही असे सांगून नाकारण्याचे प्रकार घडले.च्सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक, नाफेड, पणन अधिकारी, खरेदी यंत्रणा व व्यापारी यांच्या संगनमतातून ही खरेदी केली.भाव ३५०० रु.वरकालपर्यंत नाफेडमार्फत तूरखरेदी सुरु असताना ५ हजार ५० रुपये भाव दिला जात होता. आज नाफेडने खरेदी बंद करताच बाजारामध्ये तुरीचा भाव ३५०० ते ३८०० रु. क्विंटल इतका कमी झाला. खरेदी सुरू न झाल्यास आंदोलन-मुंबई : सरकारने नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी केंद्र अचानक बंद करून राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरू न केल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी आंदोलनाच्या पवित्र्यातसोलापूर : सरकारने तूर खरेदी केंद्रे पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, की भाजपा सरकार फक्त टिष्ट्वटरवरून टिवटिव करत आहे. शेतकऱ्यांच्या कजार्माफीच्या मागणीसाठी सुरू झालेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा मंगळवारी कोल्हापूर येथून सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
नाफेडने खरेदी केलेली निम्मी तूर व्यापाऱ्यांची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2017 2:29 AM