शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

जूनमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस

By admin | Published: June 29, 2016 8:38 PM

या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

ऑनलाइल लोकमतपुणे, दि. २९ : या वर्षी जून महिना संपला, तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नसून सरासरीच्या निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे भात वगळता खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत ४.३७ टक्के इतक्याच क्षेत्रावर पेरण्या झाल्या. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जून महिन्यात १४२.४० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी आजपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.

हवामान विभागाने वेळोवेळी वर्तवलेल्या आंदाजानुसार चांगला पाऊस या वर्षी पडेल, असे सांगितले गेले. यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. कृषी विभागानेही तयारी करून तालुक्यानुसार बैैठका घेऊन नियोजन सांगितले. मात्र, गेला महिनाभर पाऊस हुलकावणीच देत आहे. सुरुवातीला भात उत्पादकांनी धूळवाफेवर काही ठिकाणी पेरण्या केल्या. मात्र, पाऊसच येत नसल्याने त्या वाया जातात की काय, असा पेच निर्माण झाला होता. पण, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काहीसा पाऊस झाल्याने त्या पेरण्या वाचल्या. मात्र, पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी पेरण्या कराव्या की नाही, अशा विवंचनेत सापडला आहे.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जूनपासून २८ जूनपर्यंत फक्त ७८.९२ मिलिमीटर इतकाच पाऊस जिल्ह्यात झाला आहे. गेल्या वर्षी तो २२७.२१ मिलिमीटर झाला होता. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाला निम्मी सरासरी गाठता आली नसल्याने चिंता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस (मिमी)आंबेगाव : ३६.९०बारामती : ९६.८०भोर : ६६.२०दौैंड : ८८.१०हवेली : २७.१०इंदापूर : १५७.७०जुन्नर : ५९.४०खेड : ९४.६०मावळ : १०५.३०मुळशी : १०८.६०पुरंदर : ३३.८०शिरूर : ४२.७०वेल्हा : १०८.७०फक्त ४.३७ टक्के पेरण्यापाऊस हुलकावणी देत असल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत उसासह फक्त ४.३७ टक्के इतक्यात क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक सोयाबीनच्या ३३.६ टक्के इतक्या पेरण्या झाल्या असून, त्याखालोखाल मुगाच्या ३२.४ टक्के, मका १५.७, बाजरी १०.६, भात ४.८, ज्वारी २.९,उडीद ९.०, भुईमूग ३.६ टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. भात ४.८ टक्केखरीप हंगामात भात हे पीक सर्वाधिक सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. या वर्षीच्या नियोजनात ५५ हजार हेक्टरवर ते घेण्याचे ठरविले होते. जून महिन्यात भाताचा जवळपास १०० टक्के क्षेत्रावर पेरण्या होतात; मात्र या वर्षी सरासरीच्या फक्त ७२९.५ हेक्टरवरच पेरण्या झाल्या असून, ती टक्केवारी ४.८ इतकीच आहे. पावसाची कृपा झाली नाही, तर यंदा भात उत्पादकांवरही संकट येण्याची शक्यता आहे