शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बारावीच्या पेपरफुटीचे सत्र सुरूच

By admin | Published: March 07, 2017 6:15 AM

इयत्ता बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर फुटण्याचे सत्र सोमवारीही सुरूच राहिले

मुंबई /नवी मुंबई : इयत्ता बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर फुटण्याचे सत्र सोमवारीही सुरूच राहिले. गणिताचा पेपर सुरू होण्यास २० मिनिटे असताना १०.४० वाजता तो व्हॉट्सअ‍ॅपवर आला. पेपर परीक्षेपूर्वीच व्हायरल झाल्याची ही तिसरी घटना असल्याने परीक्षा यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणांना अटक झाली आहे. वांद्रे येथील एमएमके परीक्षा केंद्राबाहेर एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आढळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.पोलिसांनी आतापर्यंत राहुल भास्कर (२२), अझरुद्दीन शेख (२०), मोहम्मद अमन मोहम्मद इस्लाम शेख (१८) व सुरेश झा (२६) या चौघांना अटक केली आहे. सुरेश झा हा खासगी क्लासचा शिक्षक आहे. त्याने क्लासच्या विद्यार्थ्यांकरिता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका शेअर केली होती. मोहम्मद शेख हा त्याच्याच क्लासचा विद्यार्थी असून तो बाहेरून बारावीची परीक्षा देत होता. त्यानेही स्वत:कडे आलेली मराठीची प्रश्नपत्रिका इतर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पाठवली होती. तर राहुल व अझरुद्दीन हे सिनीअर कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनीही स्वत:कडे आलेला पेपर व्हायरल केला होता. शिवाय संशयित विद्यार्थ्यांचे २० मोबाइल वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.त्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका कोणी पाठवली, याच्या तपासाकरिता हे मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.दरम्यान, चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)>मुंबईत दोन ठिकाणी कॉपीसोमवारी बारावीची परीक्षा सुरु असताना सकाळच्या सत्रात गणिताचा पेपर सुरू असताना वांद्रे येथील एमएमके महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला आणि मालाड येथील पी.डी. सुराखिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला कॉपी करताना पकडण्यात आले आहे. पेपरनंतर परीक्षा केंद्रावर त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. >दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा!महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षार्र्थींची संख्या ३८ हजारांनी वाढली आहे. बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत. >असे फुटले पेपर..!२ मार्च मराठीचा पेपर सकाळी १०.४६ ला ४ मार्च सेक्रेटरीयल प्रॅक्टिसचा पेपर १०.४७ ला ६ मार्च गणिताचा पेपर सकाळी १०.४० वाजता