मुंबई : 25 जूनपासून होणा:या रेल्वे भाडेवाढीत लोकल पास महागल्याने सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी पास काढण्यासाठी एकच गर्दी मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर झाली. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर तर गेल्या दोन दिवसांत महिन्याच्या पासाची प्रचंड विक्री होत असतानाच सहामाही आणि वार्षिक पासालाही प्रतिसाद प्रवाशांकडून देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांत पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी गर्दी झाली. मासिक आणि त्रैमासिक पास प्रवासी काढत असतानाच सहामाही आणि वार्षिक पासालाही अधिक पसंती प्रवाशांनी दिली आहे. एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या सहामाही आणि वार्षिक पासाला सुरुवातीपासून जेमतेम प्रतिसाद मिळत असतानाच या वेळी वाढलेल्या रेल्वे भाडेवाढीमुळे या दोन्ही पासांची विक्री वाढली आहे. अनेक जण सहामाही आणि वार्षिक पास आताच काढणो पसंत करीत आहेत. सोमवारीही त्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले.
पासाचे दर हे दुप्पट झाले असून विमानप्रवासाएवढीच रेल्वेच्या फस्र्ट क्लास पासाची किंमत झाली आहे, तर सेकंड क्लास पासही महागच झाला आहे. ही नवीन भाडेवाढ 25 तारखेपासून लागू होणार असल्याने त्यापूर्वीच पासधारकांनी जुन्या
दराचे पास काढण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे भाडेवाढीची सुनावणी आज
वाढ रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या असून, यावर मंगळवारी सुनावणी होणार आह़े एक याचिका मुंबई ग्राहक पंचायतने अॅड़ उदय प्रकाश वारुंजीकर यांच्यामार्फत केली आह़े ही भाडेवाढ घटनाबाह्य असून प्रवाशांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आह़े त्यामुळे या भाडेवाढीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आह़े दुसरी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली आह़े या भाडेवाढीने सर्वसामान्यांचे दैनंदिन बजेट कोलमडेल़ त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी तिरोडकर यांनी याचिकेत केली आह़े
फुकटातच रेल्वे प्रवास करावा - आव्हाड
औरंगाबाद : भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणोच अशक्य झाले आहे. त्यामुळे जनता आता विनातिकीट प्रवास करील. राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानीदेखील फुकटातच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी औरंगाबाद येथे केल़े ‘कॉफी वुईथ स्टुडंट्स’ कार्यक्रमात ते बोलत होते.
सेना-भाजपा खासदार रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार
मुंबई - रेल्वे भाडेवाढीचा फटका मुंबईकरांना सर्वाधिक बसणार असल्याने आणि त्याचा सर्वच स्तरांतून निषेध नोंदवण्यात येत असल्याने शिवसेना-भाजपाचे खासदार 24 जून रोजी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेणार आहेत. विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपाचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांची भेट घेईल आणि प्रवाशांच्या भावना पोहोचवील, असे विनोद तावडे
यांनी सांगितले. पासची किंमत
दुप्पट होणार असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे तावडे म्हणाले.
पश्चिम रेल्वे : पासची विक्री
21 जून22 जून23 जून
(सायं.5)
मासिक29,81917,92324,190
त्रैमासिक9,52710,34213,985
सहामाही1,6362,9644,853
वार्षिक1,4343,0325,527
मध्य रेल्वे : पासची विक्री
21 जून22 जून
मासिक37,13120,600
त्रैमासिक7,3089,697
सहामाही8742,346
वार्षिक5511,381