बुलडाणा : वाहन चालविताना सुरक्षेसाठी असलेला सीट बेल्ट वापरण्याबाबत वाहन चालक व मालक हलगर्जीपणा करताना दिसून येत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षणातून आढळले आहे. यात वाहतुकीवर नियंत्नण ठेवणार्या शहर वाहतूक शाखेलाही फारसे गांभीर्य नसल्याचे दिसले असून, शहरात मागील एका महिन्यात अद्यापपर्यंत एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले.केंद्रीय ग्रामविकास मंत्नी गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना केंद्रीय आरोग्यमंत्नी डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. याच वेळी त्यांनी गाडी चालविताना सुरक्षेची उपाययोजना म्हणून सीट बेल्ट बांधण्यासंदर्भात व्यापक जनजागृती मोहीम छेडण्याचेही जाहीर केले. आरोग्यमंत्र्यांच्या या विधानाच्या पृष्ठभूमीवर किती वाहनचालक सीट बेल्ट बांधून आपल्या जीवाची काळजी घेतात, या अनुषंगाने बुलडाणा शहरातील विविध चौकांमध्ये शनिवारी ७ जून रोजी दिवसा फेरफटका मारला. यावेळी जयस्तंभ चौक, कारंजा चौक, संगम चौक तसेच तहसील कार्यालय चौकात वाहनांचा सर्व्हे केला. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील वर्दळीच्या संगम चौकात दुपारी १२.00 ते १२.१५ वाजेदरम्यान कार व जीप मिळून ३२ वाहने रवाना झाली. यातील एकाही वाहनचालकाने सीट बेल्ट बांधला नसल्याचे दिसले. नेमकी अशीच परिस्थिती शहरातील जयस्तंभ चौक, कारंजा चौक तसेच तहसील कार्यालय चौक आदी भागात दिसून आली. बोटावर मोजण्याइतपत वाहनचालकांकडे सीट बेल्ट होते; परंतु सीट बेल्ट कोणीही बांधले नसल्याचे दिसून आले. सीट बेल्ट न वापरणार्यांमध्ये शासकीय कार्यालयातील चालक तसेच महसूल व पोलिस विभागाचे कर्मचारीही दिसून आले.
सीट बेल्ट वापरण्याबाबत हलगर्जी
By admin | Published: June 07, 2014 11:09 PM