शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हँकॉक पूल इतिहासजमा

By admin | Published: January 11, 2016 2:27 AM

१८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची वेळ, मनस्ताप सहन करूनही प्रवाशांनी दाखवलेली सहनशीलता आणि दिवसभर ६५० रेल्वे कामगारांचा असलेला राबता

मुंबई : १८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची वेळ, मनस्ताप सहन करूनही प्रवाशांनी दाखवलेली सहनशीलता आणि दिवसभर ६५० रेल्वे कामगारांचा असलेला राबता अशा घडामोडीनंतर अखेर १३६ वर्षे जुना सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन हँकॉक पूल इतिहासजमा झाला. रविवारी मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई पालिकेकडून हँकॉक पूल पाडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वेच्या अनेक प्रकल्पांनाही गती मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.भायखळा ते सॅन्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यान कमी उंची, धोकादायक स्थिती, यामुळे रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत असलेला हा पूल तोडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय निर्णय पालिका आणि रेल्वेने घेतला. पालिकेने हा पूल तोडण्याचे काम साधारपणे नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू केले होते. मात्र, रेल्वे ट्रॅकवरील या पुलाचा भाग तोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ९ जानेवारीच्या मध्यरात्री सुरू करण्यात आले. कोणत्याही स्थितीत १० जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निश्चय मध्य रेल्वेने केला होता. या कामासाठी १८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. मेन लाइनवरील सीएसटी ते भायखळा दरम्यानच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्याचे अचूक नियोजन रेल्वे प्रशासनाने केले. रविवारी दिवसभर काम सुरू राहणार असल्याने १०० पेक्षा अधिक लोकल फेऱ्या, ४२ लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. शिवाय ४२ ट्रेनचे सुरुवातीचे व शेवटचे थांबेही बदलण्यात आल्याने रविवारचा दिवस प्रवाशांसाठी अत्यंत जिकिरीचा ठरला. दुपारनंतर काही स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती, परंतु गेले काही दिवस प्रसारमाध्यम आणि रेल्वे प्रशासनाकडून हँकॉक पुलाबाबत सतत माहिती देण्यात येत होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही, तर हार्बर मार्गावरून सीएसटीपर्यंत पोहोचता येणे शक्य असल्याने, अनेकांनी हार्बरचा पर्यायही निवडला होता. यशस्वी नियोजनामुळे उपनगरीय स्थानकांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रवाशांनीही सहनशीलता ठेवत रेल्वेच्या नियोजनाला प्रतिसाद दिला. दरम्यान, हँकॉक पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी रेल्वेचे ६५० रेल्वे कामगार व कर्मचारी, ५० अभियंते उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात यंत्र सामुग्रीही त्यांच्या मदतीला होती. लोखंडी पूल पूर्णपणे तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस कटर आणि चार क्रेनचाही वापर करण्यात आला. अखेर हा पूल तोडण्याचे काम सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्ण झाले. त्या नंतर सीएसटी ते भायखळ््यापासूनची लोकल सेवा सुरू करण्यात आली. या कामावेळी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा हे प्रत्यक्ष उपस्थित होते.(प्रतिनिधी)