शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मैदानांची देखरेख ठेकेदारांच्या हाती

By admin | Published: April 28, 2016 6:08 AM

खासगी संस्थांना दिलेली ७६ मनोरंजन व खेळाची मैदाने पालिका प्रशासनाने आतापर्यंत ताब्यात घेतली

मुंबई : देखभालीसाठी खासगी संस्थांना दिलेली ७६ मनोरंजन व खेळाची मैदाने पालिका प्रशासनाने आतापर्यंत ताब्यात घेतली असून आता उर्वरित १७० मैदानेही ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थांना नोटीस पाठविण्यात येणार आहे़ या मैदानांच्या देखरेखीसाठी ठेकेदार नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़मुंबईतील मनोरंजन व खेळाच्या मैदानासाठी नवीन धोरण पालिकेने तयार केले़ मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली़ तसेच खासगी संस्थांकडे असलेली मैदाने, क्लब, जिमखाना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही त्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७६ मैदाने ताब्यात घेण्यात आली आहेत़ मात्र नवीन धोरण लागू होईपर्यंत या मैदानांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होणार आहे़ आतापर्यंत ताब्यात आलेल्या ७६ मैदानांची देखभाल वॉर्डस्तरावरील कामगार करीत आहेत़ परंतु सर्व मैदानांची देखभाल अशा पद्धतीने ठेवणे अशक्य असल्याने पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे़ त्यानुसार ठेकेदारांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर होताच दोन दिवसांत इतर संस्थांना नोटीस पाठवून १७६ मैदाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला दिली़ (प्रतिनिधी)>मैदानांमध्ये काय असणारच्ताब्यात घेतलेल्या मैदानांचा विकास केल्यानंतर त्यात हिरवळ, खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य असणार आहे़ च्मोकळ्या जागांच्या देखभालीबरोबर व्हॉलीबॉल, खोखो, कबड्डी, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, उंच उडी, गोळाफेक, रनिंग ट्रॅक आणि ओपन जिमसाठी लागणारे साहित्य अशा मैदान व उद्यानांमध्ये पुरविण्याचे ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे़ >या मैदानांवरून सुरू होता वादच्मुंबई क्रिकेट असोसिएशनच्बोरीवली येथील बिगर शासकीय संस्था सिटी स्पेसच्विलेपार्ले येथील रमेश प्रभू यांचे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलच्राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे मातोश्री सुप्रीमो क्लब च्खा.गोपाळ शेट्टी यांचा पोईसर जिमखानाच्कमला विहार स्पोटर््स क्लबच्वीर सावरकर उद्यानच्झाँसी की रानी उद्यानच्विनोद घोसाळकर यांच्या संस्थेचे दहिसर स्पोटर््स फाउंडेशनच्मंत्री सुभाष देसाई यांच्या संस्थेचे गोरेगाव येथील प्रबोधऩ>विरोधी पक्षांनी घेतली हरकतताब्यात घेतलेले भूखंड पुन्हा देखभालीसाठी ठेकेदारांकडे सोपविण्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आलेल्या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाने विरोध दर्शविला़ या मैदानांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात़मात्र प्रत्यक्षात मैदानांमध्ये पाणी, शौचालय याची सोय नाही, मनोरंजनाचे साहित्य नाही, अशी अवस्था असल्याने सार्वजनिक पैशाची नासाडी होत आहे, असा संताप विरोधकांनी व्यक्त केला़ मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपाने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला़