ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. १० - रस्ता क्रॉस करून देण्यासाठीही अपंगाला मदत करण्याची आपली संस्कृती, मात्र चिंचवडमध्ये एक अपंग आगीमध्ये होरपळत असतानाही कोणी त्याच्या मदतीला धावून गेले नाही. त्यामुळे चिंचवड स्टेशन येथे रोहित्रच्या स्फोटात गटई कामगार पोपट बनसोडे यांचा मृत्यू झाला.
आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेले बनसोडे गेल्या काही वर्षापासून रोहित्रखाली बसून गटई काम करीत होते. ते कुटुंबातील कर्ता पुरुष होते. त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, विद्युत महावितरणने त्यांच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.
पुणे- मुंबई महामार्गावरील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाणी चिंचवड येथे विद्युत रोहित्रचा स्फोट होऊन गटई कामगार बनसोडे यांचा मृत्यू झाला. रोहित्रतील तेल अंगावर पडून धोका निर्माण झाला असताना, पायाने अधू असल्याने त्यांना जीव वाचविण्यासाठी पळता आले नाही. एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक उजवीकडून वळविण्यात आली असल्याने पिंपरीहून चिंचवडकडे येणा-या मार्गात त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता.
त्यामुळे ही घटना घडली, त्या वेळी बनसोडे यांना तातडीची मदत मिळाली नाही. विद्युत रोहित्रची आग विझविणा-या अग्निशामक दलाचा बंब त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी आल्या. चिंचवड चौकातून वळसा घेऊन बंब पाहोचेर्पयत रोहित्रने पेट घेतला होता. आगीच्या ठिणग्या पडून बनसोडे बसलेल्या परिसरातील हातगाडी, रिक्षा आणि एका मोटारीने पेट घेतला होता. पेटलेल्या वाहनांच्या आगीत घेरलेल्या बनसोडे यांना पाय अधू असल्याने स्वत:हून बाहेर पडणोही कठीण झाले होते.
शारीरिक अपंगत्व, त्यात मदतीला कोणी नाही, यामुळे बनसोडे यांचा या घटनेत मृत्यू झाला. चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर झोपडपट्टीत छोटय़ा खोलीत कुटुंबासह राहणारे बनसोडे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून हवालदिल झाले आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रची सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता न घेतल्याने ही दुर्घटना घडली आहे. त्यात गरीब कुटुंबातील बनसोडे यांचा बळी गेला.
बनसोडे कुटुंबीयांना विद्युत महावितरणकडून भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्युत महावितरणच्या अधिका:यांनी मात्र या घटनेला विद्युत महावितरण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. विद्युत रोहित्रच्या ठिकाणी होणा:या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, असे त्यांचे म्हणणो असून, बनसोडे कुटुंबीयांना कोणाकडून मदत मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.