शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

पोलिसांच्या हक्कासाठी सरसावले हात

By admin | Published: September 21, 2016 12:39 AM

स्वाभिमान संघटनेतर्फे राबविण्यात आली सह्यांची मोहीम

कोल्हापूर : सण, उत्सव, कुटुंबातील सुख-दु:खांच्या प्रसंगीसुद्धा कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या पोलिसांची संघटना झाली पाहिजे, या न्याय्य हक्काच्या समर्थनार्थ मंगळवारी शेकडो हात पुढे आले. पोलिसांनाही त्यांचा अधिकार मिळावा म्हणून आमदार नीतेश राणे यांनी २५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पोलिसांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणारी पोलिस संघटना असावी, यासाठी तसेच पोलिसांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहोचावेत यासाठी आमदार राणे यांच्या मार्गदर्शनासाठी मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या या मोहिमेचा प्रारंभ सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त पंढरीनाथ मांढरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस, संतोष कांबळे, स्वाभिमान संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर उपस्थित होते. सह्णांची ही मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. कोल्हापुरात दोन दिवस मोहीम घेण्यात आली.आता कोल्हापुरात मुख्यालयात स्वाक्षरी मोहीम झाल्यावर आज, बुधवारपासून जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांसमोर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर फलकावर केलेल्या सर्व स्वाक्षऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहेत.- सचिन तोडकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटना, कोल्हापूर.