नागपूर : निष्पाप कुशची निर्घृण हत्या करणाऱ्या आयुष पुगलियाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा यांनी गुरुवारी प्रकरणातील विविध मुद्दे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केली.या प्रकरणातील अपिलांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी सुरू आहे. ८वर्षीय कुशचा आयुषवर विश्वास होता. यामुळे तो आयुषने बोलावल्यानंतर मागे-पुढे न पाहता धावत गेला. त्याचे आयुषसोबत कोणतेही वैर नव्हते. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येमुळे कटारिया कुटुंबाचा वंश संपला. आयुषने कुशची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली हे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होते. ही दुर्मिळातली दुर्मीळ घटना आहे. यामुळे आरोपी आयुष फाशीच्याच शिक्षेस पात्र आहे, असे अॅड. डागा यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी एका मुलाने कुशच्या घरी खंडणीसाठी फोन केला होता. कुशची आई छाया यांनी फोन उचलला होता. कुश परत हवा असल्यास २ कोटी रुपये द्या. अन्यथा त्याची हत्या करू, अशी धमकी संबंधित मुलाने दिली होती. यावरून कुशचे खंडणीसाठी अपहरण केल्याचे सिद्ध होते.
आयुष पुगलियाला फाशी द्या
By admin | Published: May 02, 2015 1:09 AM