शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

‘त्या’ चौघांवर अटकेची टांगती तलवार

By admin | Published: October 28, 2015 2:30 AM

प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या चारही नगरसेवकांना तात्पुरता जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.

ठाणे : प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये उल्लेख असलेल्या चारही नगरसेवकांना तात्पुरता जामीन देण्यास ठाणे न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे. परमार यांच्या ‘सुसाईड नोट’मध्ये विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या नगरसेवकांची नावे असल्याचे पोलिसांनी मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे या नगरसेवकांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी अर्ज केला. चव्हाण यांच्या अर्जावर २९ आॅक्टोबरला तर जगदाळे, मुल्ला आणि विक्रांत यांच्या अर्जावर ३१ आॅक्टोबरला सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर अर्जावरील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक होऊ नये, अशी मागणी या नगरसेवकांच्या वकीलांनी केली. मात्र, असा तात्पुरता जामीन मंजुरीस न्यायालयाने नकार दिल्याने त्यांच्या अटकेची तलवार कायम आहे. परमार कुटुंबियांना संरक्षणया नगरसेवकांची नावे जाहीर करतांनाच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरविल्याची माहिती सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली. परमार आत्महत्या घटनाक्रम* ७ आॅक्टोबरला बिल्डर सूरज परमार यांची आत्महत्या* या प्रकरणात ‘गोल्डन गँग’चा हात असल्याची चर्चा* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांची तक्रार* परमार यांना न्याय मिळण्यासाठी ठाण्यातील बिल्डर एकवटले* चार नगरसेवकांची नावे व्हॉटअ‍ॅपवर व्हायरल* मुख्यमंत्र्यांचे नगरसेवकांसह सूत्रधारांवर कारवाईचे संकेत* पोलिसांकडून चार नगरसेवकांची नावे अधिकृतपणे जाहीर* तात्पुरता जामीन देण्यास न्यायालयाचा नकार...............................