राम देशपांडे/ अकोला :स्वरानंदवनच्या माध्यमातून आनंदवनातील आदिवासींच्या जीवनात आनंद भरणारे हिंमतग्राम उभारण्यात येणार असल्याची माहिती स्वरानंदवनचे जनक डॉ. विकास आमटे यांनी दिली. आनंदवनातील अंध, अपंग आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांचा स्वरानंदवन हा सूरमय संगीत कार्यक्रम नुकताच अकोल्यात झाला. याप्रसंगी डॉ. आमटे यांनी लोकमतशी बोलताना स्वरानंदवन मागील भूमिका विषद केली. आनंदवनातील दीड हजार कलाकारांना सोबत घेणे कसे शक्य झाले?डॉ. आमटे : अर्थातच यामागची सर्व प्रेरणा मला बाबांकडूनच मिळाली. लगतच्या गावांनी, जवळच्या नातेवाईकांनी नाकारलेल्या आणि हातापायांची बोटे गळालेल्या आदिवासी बांधवांना बाबांनी जवळ केलं. बाबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. आनंदवनात आज तिसरी पिढी राहत आहे. १९७0 मध्ये बाबा सोमनाथला गेल्यानंतर खरी जबाबदारी मी स्वीकारली. या लोकांमध्ये अगणित कला आहेत. त्यांच्या या कला गुणांचा त्यांच्या उन्नतीसाठी कसा उपयोग होऊ शकतो, या संकल्पनेतूनच ह्यस्वरानंदवनह्णची निर्मिती झाली.काय आहे स्वरानंदवन?डॉ. आमटे : आनंदवनातील अंध, अपंग, आणि कुष्ठरोगमुक्त आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या कलागुणांचा आविष्कार म्हणजे स्वरानंदवन. प्रत्येकात कोणती ना कोणती कला दडलेली असते. ती कला सादर करण्यासाठी त्याला केवळ प्रोत्साहनाची गरज असते. मी तेच केलं. विविध कारणांमुळे नैराश्य आलेल्या या बांधवांमधील सुप्त गुणांचा संचार म्हणजेच स्वरानंदवन.हिंमतग्राम ही काय संकल्पना आहे?डॉ. आमटे : बाबांनी दिलेला वारसा आम्ही पुढे चालवित आहोत. या बांधवांना स्वत:च्या मेहनतीवर स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे, यासाठी खरा अट्टाहास आहे. येथे राहणार्या सर्व आदिवासी बांधव आपापल्या परीने श्रमदान करून साहित्य निर्मिती करतात. त्यांची विक्री करून त्यापासून येणारा पैसा त्यांच्या उपयोगी आणला जातो. या बांधवांना आपल्या हक्काचं घर मिळावं. यासाठी त्यांनी सादर केलेल्या कलेतून जी आर्थिक प्राप्ती होईल, त्यातून त्यांच्यासाठी हिंमतग्राम वसविले जाणार आहे. यासाठी आजपर्यंत राज्यात स्वरानंदवनचे जवळपास ८५0 प्रयोग झाले. लवकरच आनंदवनात हिंमतग्राम फुलणार, यात शंका नाही.आजच्या तरुण पिढीला काय सांगाल?डॉ. आमटे : असे नाही की सर्वच तरुण स्वत:मध्ये व्यस्त आणि मग्न आहेत. आनंदवनात सेवा कार्य करणार्या राज्यातील विविध भागातील तरुण मंडळींचा आज मोठा सहभाग आहे. केवळ तरुणांनाच नव्हे, तर इतर सर्वांना मी या माध्यमातून आनंदवनाला भेट देण्याचं निमंत्रण देतो. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, तुमच्या जीवनाला नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल.
‘स्वरानंदवन’च्या माध्यमातून फुलणार आनंदवनात ‘हिंमतग्राम’!
By admin | Published: December 24, 2014 12:02 AM