शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आमदारच करतो हप्तेबाजी

By admin | Published: November 09, 2015 9:14 PM

जयेंद्र परूळेकर यांची टीका : लवकरच नावे उघड करण्याचा इशारा

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असून, या अवैध धंदेवाल्यांकडून सत्ताधारी पक्षातील एक आमदार हप्ते घेत आहे. त्यांचे नाव आम्ही लवकरच उघड करू, असा इशारा कोणत्याही आमदाराचे नाव न घेता काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवडेकर, संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, अ‍ॅड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर म्हणाले, आचरा येथील मच्छिमारांचा विषय चिघळण्यास सत्ताधारीच जबाबदार असून, पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. जे आंदोलनकर्त्यांना पाठबळ देत होते. त्यांना अटक झाल्यानंतर पुढे पुढे करणारे पळून गेले, अशी टीका आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता डॉ. परूळेकर यांनी केली.राज्यात एकीकडे शिवसेना - भाजप पक्षातील नेते एकमेकांबरोबर भांडत आहेत आणि सत्तेचा उपभोगही घेत आहेत. आता जनतेनेच त्यांना योग्य तो धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पालकमंत्री दीपक केसरकर हे मंत्री नसताना धान्य वाटत होते. पण आता मंत्री झाल्यावर त्यांना जनता का आठवत नाही? असा सणसणीत सवाल केला.शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांचे मंत्रीपद केव्हा काढून घेतील हे सांगता येत नाही. जिल्ह््यात विकासनिधी आणण्यात अपयशी ठरलेले पालकमंत्री पाचशे कोटी आणल्याच्या वल्गना करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत नियोजनाचा निधी जिल्ह््याला मिळालेला नाही. मग पाचशे कोटी कसे आणणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले असून, या अवैध धंदेवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते एक सत्ताधारी आमदार घेत आहे. त्यात मंत्र्यांचीही भागिदारी असू शकते. मात्र, आम्ही त्या आमदाराचे नाव घेणार नाही. पत्रकारांनी आमदार शोधून काढावा. तसेच योग्य वेळ आल्यावर ते नाव आपण जाहीर करू, असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट.सत्ताधारी पक्षातील आमदारावर नाव न घेता टीका.आंदोलनकर्त्यांना सोडून नेते पळून गेल्याची टीका.लवकरच नाव उघड करणार.