शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

‘हर घर तिरंगा’ अभियान; डाक विभागाने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 6:10 AM

स्वातंत्र्य दिनाची तयारी : पोस्ट कार्यालयातून होणार तिरंगा विक्री

- शैलेश कर्पेलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू करण्यात आले. २०२२ मध्ये २३ कोटी  नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले. यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे.

 सेल्फी काढून अपलोड करता येणार फोटो... राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत, या उद्देशाने टपाल कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost4Tiranga, #HarDilTiranga. #HarGhar Tiranga या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.

 तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात संपर्क साधा... हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे. राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांत प्राप्त करू शकता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस