शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
3
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
4
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
6
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
7
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
8
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
9
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
10
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
11
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

भूकरमापकांमुळे रोहेकर हैराण

By admin | Published: July 23, 2016 3:04 AM

रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे.

मिलिंद अष्टीवकर,

रोहा- रोहा तालुक्यातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे बेभरवसी भूकरमापकांचा अड्डा बनला आहे. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने जमीन मोजणीच्या कामासाठी येणारे नागरिक वारंवार खेटे घालून हैराण होत आहेत. अपुऱ्या संख्येने कर्मचारी असल्याने या कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना भूकरमापकांच्या मिजासखोरीचा त्रास मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे. खातेदारांना अनेक वेळा गट स्कीम नकाशा, गट बुकाचा उतारा, सिटी सर्व्हे नकाशा व उतारा मिळविण्यासाठी चिरीमिरी देऊन सुद्धा अनेक फेऱ्या माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.रायगड जिल्ह्यासह तालुक्यात जमीन खरेदी-विक्र ीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु रोहा तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत आहे. ७६ भूकरमापकांच्या जागा रिक्त असून भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख असलेले उपअधीक्षक पदच रिक्त आहे. सध्या या कार्यालयाची सूत्रे पनवेल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक एस. टी. घुले यांच्याकडे प्रभारी देण्यात आलेली आहेत. त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शुक्र वार असे दोन दिवस रोहा येथे येतात असे त्यांनी सांगितले. या सर्वचा गैरफायदा येथील भूकरमापकांनी घेतलेला दिसून येतो. मोजणीसाठी आलेल्या नागरिकांकडे मोजणीच्या जागेवर जाण्यासाठी गाडी किंवा रिक्षा, दारू, मटणाचे जेवण तसेच पैशांची मागणी करत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या वेळी हजर राहण्यासाठी द्यावयाच्या नोटिसा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत संबंधितांना टपालाद्वारे न पाठवता संबंधित नागरिकालाच कब्जेदारांना नोटिसा बजावण्यास भूकरमापकांकडून सांगितले जाते. मोजणीसाठी भूकरमापकांना निशाणदार, चार मजूर, चुना, उंच काठ्या, छत्री या गोष्टी ज्या व्यक्तीला मोजणी करावयाची आहे त्यालाच पुरवाव्या लागतात. >नागरिकांच्या तक्रारीभूकरमापकांची सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराला मोजणी नकाशा उपलब्ध करून न देणे, हिश्शाच्या खुणांबाबत माहिती न देणे, काम अर्धवट ठेवणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने अनेक जण या भूकरमापकांची सरबराई करण्यातच धन्यता मानतात. सरबराई न केल्यास संबंधित खातेदाराचा वेळ व पैसा दोन्ही वाया जाऊन मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्र ारी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांच्याकडे आल्या आहेत.