भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने सर्व पक्ष एकत्र आले: बागडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:27 AM2020-01-11T11:27:17+5:302020-01-11T11:37:59+5:30

पक्षातील पद हे शोभेसाठी नव्हे तर पक्षाला बळ देण्यासाठी असतात.

Haribhau Bagde said All the parties came together against the BJP | भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने सर्व पक्ष एकत्र आले: बागडे

भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने सर्व पक्ष एकत्र आले: बागडे

googlenewsNext

मुंबई : केंद्रात सलग दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली असून देशभरातील इतर पक्षांनी एकत्र येत विरोधी पक्षाची भूमिका घेतली आहे. तर याच मुद्यावरून माजी विधानसभा अध्यक्ष व भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने सर्व पक्ष एकत्र आले असल्याचे बागडे म्हणाले.

कधीकाळी देशातील सर्व राजकीय पक्ष हे काँग्रेसच्या विरोधात होते. त्यावेळी त्यांची सत्ता होती. त्याचप्रमाणे आता भाजप विरुद्ध अन्य सर्व पक्ष एकत्र आले आहेत. तर भाजपने देशात मोठी ताकद उभी केल्याने सर्व पक्ष एकत्र आले असल्याचे बागडे म्हणाले.

तसेच पक्षात चढ-उतार येतच असतात. मात्र अशा परिस्थितीत पक्षाला पुढे नेण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार असल्याचे बागडे म्हणाले. नगरमध्ये भाजपच्या संघटन पर्व तसेच भाजप पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पक्षातील पद हे शोभेसाठी नव्हे तर पक्षाला बळ देण्यासाठी असतात. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी सभासद वाढवावे. केवळ प्रदेशने दिलेला कार्यक्रम करणे एवढीच पदाधिकाऱ्यांची जवाबदारी नसल्याचे सुद्धा यावेळी बागडे म्हणाले.

 

 

 

 

Web Title: Haribhau Bagde said All the parties came together against the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.