शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कृषी, सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला; पांडुरंग फुंडकर यांना सर्वपक्षीय आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:42 AM

भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते.

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुंडकर यांच्या संसदीय कार्याविषयी ग्रंथ निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांप्रती प्रचंड कणवअसलेले भाऊसाहेब हे एका पिढीला दुसºया पिढीशी जोडणारे व्यक्तिमत्व होते. मंत्रीमंडळांतील ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याकडे प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक अनुभव होता. जमीनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्याचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केल्याने कृषी उत्पादनात गुणात्मक मोठी वाढ झाली. पक्ष संघटना पातळीवर, विचार परिवारातील सर्व कार्यकर्ते, संघटनांना भाऊसाहेबांचा हक्काचा आधार होता. त्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणात मोठे झालो. विधान मंडळातील त्यांचे कर्तृत्व लोकांसमोर येण्यासाठी राष्टÑकुल संसदीय मंडळातर्फे ग्रंथ निर्माण करण्यात यावा, त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले, की शेतकरी वर्गाच्या समस्या ते सातत्याने मांडायचे. विदर्भात सहकार क्षेत्रात त्यांनी काम केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत केले. ते म्हणाले, की शेतकºयांच्या प्रश्नांची ते अत्यंत पोटतिडकीने मांडणी करीत असत. त्यांच्या प्रश्नाबाबत जागृत होते.त्यांचे काम नेहमीच स्मरणात राहील. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल,विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,परिवहनमंत्री दिवाकर रावते, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाप्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब दानवे, शेकापचे आमदार जयंत पाटील, मनसेचे बाळा नांदगावकर आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी भाऊसाहेबाचे जीवनपट उलगडून दाखविणारी ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस