शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरी

By admin | Published: January 07, 2017 5:08 AM

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

औरंगाबाद : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरूळला शासकीय बैठकीनिमित्त दौरा होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा वेरूळहून एमटीडीसीकडे जात असल्याने विरेगावचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी वाहतूक थांबविली होती. आमदार हर्षवर्धन जाधव (तेव्हा ते ‘मनसे’त होते) हे औरंगाबादहून फॉर्च्युनर गाडी स्वत: चालवीत आले. त्यांनाही पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी वाहन न थांबविता बंदोबस्तावरील पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पोलीस बाजूला झाले व जाधव हे न थांबता वेरूळकडे निघून गेले. पोलीस निरीक्षक कोकणे यांनी वायरलेसवरून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी महावीर स्तंभाजवळ जाधव यांची गाडी थांबविली. पाठोपाठ कोकणेसुद्धा तेथे गेले. त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकणे यांना मारहाण केली. या वेळी महिला पोलीस कर्मचारी कांचन शेळके आणि शहनाज शेख यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यासंदर्भात कोकणे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आमदार जाधव यांच्यासह मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आणि वाहनचालक संतोष सूर्यभान जाधव यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०७, ३५३, ३३२, ३३३, ३५४, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास खुलताबादचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने जाधव यांना भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ खाली प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. जाधव यांची इतर कलमांखाली निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच दिलीप बनकर आणि संतोष जाधव यांचीसुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)...तर समाजात वेगळा संदेश जाईलन्यायालयाने जाधव यांना शिक्षा घोषित करताच त्यांनी न्यायालयास विनंती केली की, वरील घटनेनंतर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. ते विद्यमान आमदार असून, लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यांना ‘प्रोबेशन आॅफ आॅफेंडर्स अ‍ॅक्ट’चा लाभ देत चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, सध्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होत असलेले हल्ले आणि लोकप्रतिनिधींची ‘अशी’ वर्तणूक या पार्श्वभूमीवर जाधव यांना वरील लाभ दिला तर समाजात वेगळा संदेश जाईल, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने जाधव यांची विनंती अमान्य केली. >दंड भरून शिक्षेला तात्पुरती स्थगितीन्यायालयाने निकाल घोषित केल्यानंतर जाधव यांनी दंडाची रक्कम तत्काळ न्यायालयात जमा करून वरील आदेशाविरुद्ध अपील दाखल करेपर्यंत (३० दिवसांपर्यंत) शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली असता न्यायालयाने ती मंजूर केली.