Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 01:34 PM2024-09-29T13:34:24+5:302024-09-29T13:34:49+5:30

Balasaheb Thorat: आमदार बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

Harshvardhan Patil was given good opportunities in Congress his decision was wrong Balasaheb Thorat said clearly | Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं

Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं

Balasaheb Thorat ( Marathi News ) : राज्याच काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपमधून हर्षवर्धन पाटील बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"हर्षवर्धन पाटील यांना आतापर्यंत मोठी संधी मिळाल्या आहेत. त्यांच्यात तेवढी क्षमता आहे, ते आमचे मित्र आहेत. त्यांनी भाजपाकडे जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटत आहे.  मी त्यांना जाऊ नका म्हणून आग्रहाने सांगितलं होतं. आपलं व्यक्तिमत्व काँग्रेसच्या वाटेवर घडलं आहे, आता पुन्हा परत येतील असं वाटतंय, असंही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. 

भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान

"आमचं विधानसभेत पहिलं बहुमत मिळवणं आहे. आमच्यात मुख्यमंत्री कोणही घेईल, असंही थोरात म्हणाले. भाजपाची काम करण्याची पद्धत लोकशाही विरोधात आहे. ते पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवतात आणि तेच पैसे सरकार आणण्यासाठी वापरतात, असा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला. 

बाळासाहेब थोरात म्हणाले, मुख्यमंत्रि‍पदाबाबत फक्त कार्यकर्ते बोलत आहे,  आम्ही निवडणुकीला एकत्र जाणार आहे.त्यानंतर मुख्यमंत्रि‍पदाबाबत चर्चा करणार आहे. कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात चालेल त्यावर विचार सुरू आहे. आम्ही जागा मागतो पण आम्ही बैठकीत निर्णय घेतो, असंही थोरात म्हणाले. 

शरद पवारांचं मोठं विधान

 इंदापूर मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपाचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटीलशरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, तुतारी चिन्हावर लढतील असं बोललं जातंय. मात्र याच चर्चेवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मोठं विधान करत हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे.

बारामती इथं पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, इंदापूरात बदल घडेल अशी स्थिती सध्या आहे. काही मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते ही जागा आमची आहे. मित्रपक्षांनाही जागा द्यावी लागते. आघाडी म्हटल्यावर तडजोड करावी लागते. काही जागा सोडाव्या लागतील. ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावे लागेल. निवडणुकीत ज्यांनी कष्ट केले त्या कार्यकर्त्यांचे ऐकावे लागेल. आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा असं हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर पवारांनी म्हटलं. 

Web Title: Harshvardhan Patil was given good opportunities in Congress his decision was wrong Balasaheb Thorat said clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.