शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 8:32 PM

Haryana Assembly Election 2024: हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली.

हरयाणा विधानसभा निवडणुकीतचे निकाल हे अनेकांसाठी धक्कादायक असे ठरले आहे. येथे झालेल्या अटीतटीच्या मुकाबल्यामध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का देत भाजपाने ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. येथे अवघ्या ३२ मतांनी जय-पराजयाचा फैसला झाला. धक्कादायक बाब म्हणजे हरयाणाचं उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या दुष्यंत चौटाला यांचा येथे दारुण पराभव झाला. त्यांना पाचव्या स्थानावर राहावे लागले.

माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला लढत असल्याने उचाना कलां मतदारसंघावर राजकीय वर्तुळाची नजर होती. मात्र येथे दुष्यंत चौटाला यांना मतदारांनी अजिबातच प्रतिसाद दिला नाही. या मतदारसंघात भाजपाचे देवेंद्र चतुरभूज अत्री आणि काँग्रेसचे बृजेंद्र सिंह यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या मुकाबल्यामध्ये अखेरीस भाजपाच्या देवेंद्र अत्री यांनी अवघ्या ३२ मतांनी विजय मिळवला.

जिंद जिल्ह्यातील उचाना कलां या मतदासंघात दुष्यंत चौटाला यांच्यासमोर काँग्रेसचे बृजेंद्र चौधरी, भाजपाचे देवेंत्र अत्री यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांचेही आव्हान होते. त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याचे संकेत मिळत होते. मतमोजणीमध्येही येथे त्याचा प्रत्यय येत होता. मात्र अखेरीच भाजपाचे देवेंद्र अत्री आणि काँग्रेसचे बृजेंद्र सिंह हे मुख्य लढतीमध्ये उरले. अगदीच अटीतटीचा सामना असल्याने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही होत होती. बराचवेळ गोंधळही झाला. मात्र शेवटी निकाल जाहीर करण्यात आला.

या निकालांनुसार उचाना कलां विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपाच्या देवेंद्र चतुरभूज अत्री यांनी ४८ हजार ९६८ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या बृजेंद्र सिंह यांना ४८ हजार ९३६ मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार विजेंद्र घोघरियान यांना  ३१ हजार ४५६ मतं मिळाली. चौथ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार विकास यांना १३ हजार ४५८ मतं मिळाली. तर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी ७ हजार ९५० मतं मिळाली.  

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस