शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 5:36 PM

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

मुंबई - हरियाणा विधानसभा निकालाचे कल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. हरियाणात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाची आग्रही मागणी केली आहे. माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दोघांनी कुणाचेही नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी जाहीर करावे मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. मुंबईत झालेल्या राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ठाकरे बोलत होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जाहीर केले तेच सांगतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कुणाचेही नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी जाहीर करावे, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मुळात मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे, मला महाराष्ट्राचं हित साधायचं आहे. मला मुख्यमंत्री बनायचंय अशी माझ्या डोक्यात वेडीवाकडी स्वप्न पडत नाही. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत नाही. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे काही करायचं असेल ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. त्याच्या आड कुणी काळ्या मांजरासारखं येणार असेल तर त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही असं समजू नये, मला घालावीच लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच आपण जो वज्र निर्धार केलाय तो फार महत्त्वाचा आहे. तुमच्या सामाजिक संस्था स्वार्थी नाही, आपला स्वार्थ एकच माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे. या २ ठगांच्या गुलामगिरीत जगू देणार नाही हा वज्र निर्धार आपला असला पाहिजे. आम्ही गुलामी पत्करणार नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे, काळानुसार त्यात भूमिका घ्याव्या लागतात. मला देवळात बडवणारा हिंदू नको हे माझे नाही बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य आहे. बुरसटलेल्या परंपरेत हिंदू समाज अडकला होता ते माझ्या वडिलांनाही मान्य नव्हते. बुरसटलेले हिंदुत्ववादी यांच्याविरोधात प्रबोधनकार ठाकरे लढले. जो लढा आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला. नंतर शिवसेनाप्रमुखांचा काळ आला. भाजपाने जे वातावरण तयार केले त्या वातावरणातून बाहेर ते आपल्याला आणू इच्छित नाही असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लीम वाद होता, तेव्हा समाज सुधारणेचे मुद्दे बाजूला पडले. आता मी भाजपाला सोडले म्हणून हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही. भाजपाचं जे हिंदुत्वाचे थोतांड होते, त्यापासून मी बाजूला झालो आहे. हिंदुत्व कुणावरही अन्याय करणारे नाही. निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणुकीनंतर मित्रांना साथ हे मोदींसारखे आमचे हिंदुत्व नाही. ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात साथ दिली, सोबत दिली, सत्ता नव्हती, आमदार निवडून येत नव्हते. आज राज्यात आमदार निवडून आले, पंतप्रधान झाले. कठीण काळात आम्ही भाजपाला साथ दिली. आज ते माढीवर चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले. हा आत्ममतलबीपणा आहे तो आपल्याला नाही तर संपूर्ण देशाला घातक आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४