शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
4
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
5
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
6
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
7
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
8
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
9
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
10
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
11
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
12
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
13
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
14
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
15
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
16
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
17
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
18
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
19
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
20
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई

शासनानेही मराठी ऑप्शनला टाकली का? भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सवाल

By सचिन लुंगसे | Published: March 05, 2023 7:18 AM

राजभाषा कायद्याचे उल्लंघन करून कायद्याचा मसुदा इंग्रजीत तयार केला जातो. त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद करून तो मूळ मसुदा असल्याचे भासविले जाते.

मुंबई  :  मराठीत कायदे तयार करण्यासाठी विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत सक्षम यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मागील सरकारने मंजूर करून दोन वर्षे झाली तरीही अशी यंत्रणा स्थापन करण्यास मराठी भाषा विभागाला मुहूर्तच मिळालेला नाही. राजभाषा कायद्याचे उल्लंघन करून कायद्याचा मसुदा इंग्रजीत तयार केला जातो. त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद करून तो मूळ मसुदा असल्याचे भासविले जाते. १९९५ पासून ही  दिशाभूल सुरू आहे. त्यामुळे जनतेप्रमाणेच शासनानेही मराठी भाषा हा विषय ऑप्शनला टाकला आहे का, असा सवाल मराठीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

राजभाषा कायद्यानुसार १९९५ पासून राज्य कायदे व नियम मराठीत तयार करणे बंधनकारक असताना विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत त्यासाठी सक्षम यंत्रणा नाही.  मराठीत कायदे निर्माण करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याचा आग्रह माजी न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी, ॲड. शांताराम दातार  यांनी सरकारकडे धरला. परंतु, त्यांच्या हयातीत अशी यंत्रणा स्थापन होऊ शकली नाही. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विविध राज्यांचा अभ्यास दौरा करून समितीने शासनाला अहवाल सादर केला. मात्र पुढे काहीच झाले नाही.

अंमलबजावणीसाठी वेळच नाहीपुढील २५ वर्षांसाठी राज्याचे भाषा धोरण तयार करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने २०१४ मध्ये घेतला. २०१७ मध्ये या धोरणाचा अंतिम मसुदा मराठी भाषा विभागाला सादर करण्यात आला. मात्र, अद्यापही हे धोरण बासनात आहे. कारण धोरण अंमलात आणण्यासाठी मराठी भाषा विभागाला व संबंधित राज्यकर्त्यांना वेळच नाही. मराठी भाषेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायदे केल्याचा गाजावाजा होत असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची सक्षम यंत्रणा शासनाने उभी केलेली नाही.

टॅग्स :marathiमराठी