महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:54 PM2023-11-06T13:54:14+5:302023-11-06T13:55:55+5:30

"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे."

Has the people accepted the Grand Alliance government The answer to this question was found in this gram panchayat election; the same result will be seen in the Lok Sabha and the Legislative Assembly says Nitesh Rane | महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा आघाडी घेतली असून महायुतीला प्रचंड जागा मिळाल्या आहेत. जनतेने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे समर्थन असलेल्या सर्वाधक पॅनल्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यासंदर्भात बोलताना, महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे. तुम्हाला हेच निकाल उद्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट - 
नितेश राणे म्हणाले, "आज महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र म्हणजे महायुती, हे एक समिकरण झाले आहे. निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट आहे. यात आमची परीक्षा असते, आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." 

"ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तळागाळातल्या निवडणुका असतात. त्या गावपातळीवरील निवडणुका असतात. त्यामुळे, गावपातळीवर जनतेने आमच्या महायुच्या सरकारला निवडले असेल, तर तुम्हाला तेच निकाल उद्या, लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत," असेही नितेश  राणे यानी म्हले आहे. 

यापूढच्या कोणत्याही निवडणुकीत महायुती शिवाय पर्याय नाही - 
राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणतय. आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. 

राणे साहेब, रवी चव्हानजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. कुडाळ मालवनच्या मतदार संघात निलेश राणे यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. तेसेच प्रतिबिंब तुम्हाला तिन्ही मतदारसंघांत दिसत असल्याने आणि  विकास आम्हीच करत आहोत यावर जनतेचा विश्वास बसत असल्याने, आज ग्रामपंचायतीचे हे निकाल आपल्याला दिसत आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Has the people accepted the Grand Alliance government The answer to this question was found in this gram panchayat election; the same result will be seen in the Lok Sabha and the Legislative Assembly says Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.