शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

खरंच राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी ढकललं की ते पडले, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया 

By पूनम अपराज | Published: October 02, 2020 2:13 PM

Hathras Gangrape : काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे.

ठळक मुद्देदरेकर यांनी खरंच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली की ते पडले अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हाथरस येथील १९ वर्षीय बलात्कार पीडित तरुणीचा मंगळवारी दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यावरून देशातले राजकारण तापलं आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे. दरेकर यांनी खरंच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशपोलिसांनी धक्काबुक्की केली की ते पडले अशी प्रतिक्रिया दिली आहे.औरंगाबाद येथे प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्यासोबत खरोखरच काही चुकीचं वर्तन झालं असेल तर प्रशासन त्याची नक्कीच गंभीर दखल घेईल. कुठल्याही नेत्याला अशाप्रकारे धक्काबुक्की होणं योग्य नाही. पण तसं काही झालं आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी यांना नेमकं ढकलून दिलं की ते पडलेत हा विषय संशोधनाचा आहे. तो तपासला जाईल,' असं दरेकर म्हणाले. 'कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अनेकदा आमच्यावरही अशा प्रकारची कारवाई करतात. सायन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसल्यानंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह आमच्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले. पोलिसांना कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची वाटली, आम्हाला लोकांचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. असं होत असतं. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे नेते असलेल्या राहुल गांधी यांना पोलीस ढकलून देतील असं मला वाटत नाही. इतके पोलीस संवेदनाहीन नाहीत. मग ते कुठलेही असोत,' असंही दरेकर पुढे म्हणाले.काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र, यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींनापोलिसांनी अडवलं. यामुळे पायी प्रवास करत ते हाथरसकडे रवाना झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यावरून राजकीय स्थरातून अनेक प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारBJPभाजपाPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश