शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

दरवाढीला हवा ब्रेक

By admin | Published: June 26, 2014 1:01 AM

रेल्वे दरवाढीविरोधात नागपूर रेल्वेस्थानकावर शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

काँग्रेसची निदर्शने : कार्यकर्त्यांनी गोडी रोखलीनागपूर : रेल्वे दरवाढीविरोधात नागपूर रेल्वेस्थानकावर शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.रेल्वे प्रवासभाड्याच्या विरोधात सायंकाळी आम आदमी पक्षानेही जयस्तंभ चौकात भाजपविरोधी नारेबाजी करून नागपूर रेल्वेस्थानकात हस्ताक्षर आंदोलन राबविले.नागपूर शहर काँग्रेस कमिटीने रेल्वे दरवाढीविरोधात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. त्यांनी सुरुवातीला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागातील मेनगेटजवळ घोषणाबाजी केली. त्यानंतर १२७२१ हैदराबाद-ह.निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानकात शिरले. ते इटारसी एण्डकडील दक्षिण एक्स्प्रेसच्या इंजिनपुढे उभे झाले. काही पदाधिकारी हातात काँग्रेसचे बॅनर, झेंडे घेऊन इंजिनवर चढले, तर काही आंदोलनकर्ते पुढे जाऊन थेट रेल्वे रुळावर झोपले. भाजपविरोधी घोषणा, रेल्वे दरवाढ कमी करण्याच्या घोषणा यामुळे रेल्वेस्थानक परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून टाकला. अचानक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या उग्र रूपामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेमंत्री, भाजपा विरोधात घोषणाबाजी जवळपास ४० मिनिटे सुरू ठेवली. दक्षिण एक्स्प्रेस ९.५५ वाजता सुटणार होती. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही गाडी तब्बल ३० मिनिटे रोखून धरली. ‘आरपीएफ’, लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांना तेथून बाजूला केले आणि त्यानंतर दक्षिण एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. आंदोलनात सहभागी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक प्रशांत धवड, शौकत कुरेशी, अभिजित वंजारी यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अ‍ॅक्ट १७४, १४७, १५६, १४५(सी)नुसार गुन्हे दाखल केले. आंदोलनात आभा पांडे, माजी आमदार अशोक धवड, नगरसेविका रेखा बाराहाते, निमिषा शिर्के, सरस्वती सलामे, रमेश राऊत, आशा राऊत, शुभांगी चिंतलवार, जगदीश टोटलवार, हेमराज वानखेडे, गजराज हटेवार, राजा द्रोणकर, विनोद सोनकर, दिलीप जैस्वाल, कमलेश समर्थ, राजी व्यास यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)