शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

आमच्यावर दया करा

By admin | Published: September 15, 2015 2:40 AM

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात दया दाखवून कमी शिक्षा देण्याची मागणी केली़.

मुंबई : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात दया दाखवून कमी शिक्षा देण्याची मागणी केली़.विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर यातील दोषी आरोपींना हजर करण्यात आले़ त्या वेळी न्यायालयाने त्यांना या बॉम्बस्फोटासाठी दोषी धरल्याची माहिती दिली़ त्यानंतर शिक्षेबाबत प्रत्येक आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले़आरोपी अहमद अन्सारी म्हणाला, मला दोन लहान मुले आहेत़ त्यामुळे कमी शिक्षा द्यावी, तर आरोपी डॉ. तन्वीर अन्सारी यांनी जनसेवा करायची असल्याने कमी शिक्षा द्यावी, असे म्हणणे मांडले. मी कष्टाने डॉक्टर झालो आहे़ मला जनसेवा करायची आहे़ तेव्हा मला कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ़ अन्सारीने केली़आरोपी मोहम्मद शेखने त्याला मेंदूचा कर्करोग असल्याचे कारण देत कमी शिक्षा देण्याची विनंती केली़ आरोपी सिद्दिकीने आपण गरीब असल्याचे सांगत कमी शिक्षेची मागणी केली़ न्यायालयाच्या कामकामाची वेळ संपल्याने इतर आरोपींचे म्हणणे उद्या (मंगळवारी) न्यायालय नोंदवणार आहे़ वरील आरोपींस मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान यांना विशेष न्यायाधीश शिंदे यांनी ७/११ साखळी बॉम्बस्फोटासाठी दोषी धरले. तर अब्दुल शेख या आरोपीची पुराव्यांअभावी सुटका केली. उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांत १८८ जणांचा बळी गेला होता; तर ८२९ जखमी झाले होते. (प्रतिनिधी)खटल्याचा घटनाक्रम अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली. २०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला. या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवली. तसेच साडेपाच हजार पानांचा पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये याची सुनावणी पूर्ण झाली.